VIDEO | हात नसलेल्या व्यक्तीने अशी चालवली कार, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात…

हात नसलेली व्यक्ती गाडी चालवत असल्याचं पाहून अनेकांना आच्छर्य वाटलं आहे. अनेकांनी त्या व्यक्तीचं कौतुक देखील केलं आहे.

VIDEO | हात नसलेल्या व्यक्तीने अशी चालवली कार, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...
without hand driving
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 03, 2023 | 1:38 PM

मुंबई : गाडी चालवण्याचं (car drive) अनेकांकडे चांगलं स्किल आहे. गाडी चालकांचे आतापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झाले आहेत. काहीजण गाडी चालवत असताना, वेगळं स्किल (driving skill) दाखवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीला हात नाहीत. ती व्यक्ती हात नसताना गाडी चालवत आहे. त्या व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाचं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही हात नसताना गाडी चालवणं सोप्प नाही, परंतु एका व्यक्तीनं हात नसताना सुध्दा गाडी चालवली आहे.

गाडी चालवण्यासाठी कसा जुगाड…

एखाद्या गोष्टीचा जुगाड करुन गाडी कशी चालवायची हे माहित आहे. त्यात भारतीय सुध्दा कुठेचं कमी नाहीत. पण सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ हा परदेशातील आहे. दोन्ही हात नसल्यामुळे त्या व्यक्तीने गाडीत काही बदल केले आहेत. कारच्या स्टेरिंगच्या सगळी सिस्टिम त्याने पायात घेतली आहे. आता तो पायाने काल चालवत आहे. विशेष म्हणजे गाडीचा गिअर बदण्यासाठी डोक्याचा वापर करीत आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सुरक्षेचा मुद्दा…

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ Humans Are Metal नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. पायाने गाडी चालण्याचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत पाहिले असतील. परंतु सध्याचा व्हिडीओ हटके असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. अनेकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर बोटं तोंडात घातली आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की, ही अधिक कमालीची गोष्ट आहे. काहीजण म्हणतात की अशा पद्धतीने गाडी चालवणं अधिक धोकादायक आहेत.