कारच्या धडकेतून वाचला, पण दुसऱ्या संकटाने गाठलेच; विचित्र अपघाताचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

| Updated on: Oct 26, 2022 | 8:12 PM

सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या अनेक हटके आणि थरारक व्हिडिओंपैकीच हा एक व्हिडिओ. या व्हिडिओची सर्वाधिक चर्चा होऊ लागली आहे. कारण अपघातातून वाचलेला व्यक्ती काळाच्या तडाख्यात सापडला आहे.

कारच्या धडकेतून वाचला, पण दुसऱ्या संकटाने गाठलेच; विचित्र अपघाताचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
कारचा धडकेपासून वाचला, पण दुसऱ्या संकटाने गाठलेच
Image Credit source: social media
Follow us on

दैव बलवत्तर असेल तर माणूस भल्या भल्या संकटातूनही सुखरूप वाचू शकतो. पण जर वेळ आली असेल तर माणूस कितीही प्रयत्न केले तरी स्वतःचा प्राण वाचवू शकत नाही. वाईट काळ त्या व्यक्तीचा प्राण घेतल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियामध्ये व्हायरल (Viral on Social Media) झालेल्या भरधाव कारच्या व्हिडिओने (Speedy Car Video) या कटू सत्याची प्रचिती आणून दिली आहे. एक व्यक्ती भरधाव कारच्या धडकेपासून वाचला. मात्र पुढे जे नवीन संकट (New Crisis) उभे राहिले, त्यातून त्याची सुटका झाली नाही.

सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या अनेक हटके आणि थरारक व्हिडिओंपैकीच हा एक व्हिडिओ. या व्हिडिओची सर्वाधिक चर्चा होऊ लागली आहे. कारण अपघातातून वाचलेला व्यक्ती काळाच्या तडाख्यात सापडला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

रस्त्यावरील भरधाव कारची धडक बसू नये म्हणून एक व्यक्ती फुटपाथवर सुरक्षितपणे उभा राहिला आहे. तो सुरक्षित ठिकाणी उभा राहिला खरा. परंतु कारची धडक न बसताही त्याला प्राण गमवावा लागला. याला निमित्त ठरले ते रस्त्याशेजारी फुटपाथवर उभा केलेला दिशादर्शक फलकाचे.

हे सुद्धा वाचा

भरधाव कारणे या दिशादर्शक फलकाला जोराची धडक दिली. तो दिशादर्शक फलक सुरक्षित ठिकाणी उभा असलेला व्यक्तीच्या डोक्यात पडला आणि त्या व्यक्तीला प्राण गमवावा लागला.

हा दुर्दैवी प्रसंग कॅमेरामध्ये कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. आपण एखाद्या अपघातातून स्वतःला वाचवण्यासाठी काळजी घेतो. मात्र त्याचवेळी दुसरे संकटही ओढवू शकते, याची खबरदारी घेत नाही. अशा प्रकारची बेफिकिरी करू नये, असा संदेश व्हायरल व्हिडिओमधून दिला जात आहे.

फुटपाथवर चालणेदेखील सुरक्षित राहिलेले नाही!

व्हायरल व्हिडिओमधून बऱ्याच गोष्टींचा संदेश दिला जात आहे. सध्याच्या घडीला वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पादचाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. यादरम्यान फुटपाथ देखील सुरक्षित राहिलेले नाही.

आपल्या आसपास घडत असलेल्या रोजच्या अपघातांतून हेच कटू सत्य अधोरेखित होत आहे. ट्विटरवर ‘बेस्ट व्हिडिओज’ या हँडलवरून अनेक हैराण करणारे व्हिडिओ शेअर केले जातात.

यापैकीच फुटपाथवरून चालताना दिशादर्शक फलक डोक्यात कोसळून प्राण गमावलेल्या पादचाऱ्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांत बराच चर्चेत राहिला आहे.

अवघ्या काही दिवसांतच या व्हिडिओचे एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युवर्स झाले आहेत, तर लाखो लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.