Video: साहेब, मृत्यूची भीती वाटत नाही, गर्लफ्रेंडची वाटते!; एसीच्या आउटडोअर युनिटवर बसून चॅट करताना दिसला प्रेमी

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एसी यूनीटवर बसून गर्लफ्रेंडशी चॅट करत होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. पाहा व्हिडीओमध्ये काय दिसत आहे...

Video: साहेब, मृत्यूची भीती वाटत नाही, गर्लफ्रेंडची वाटते!; एसीच्या आउटडोअर युनिटवर बसून चॅट करताना दिसला प्रेमी
Viral video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 08, 2025 | 12:26 PM

असे म्हणतात की, प्रेमात माणूस सर्वच मर्यादा ओलांडतो. असेच एका तरुणाने केले आहे. त्याने सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक थक्क झाले आहेत. तसेच लोक व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण उंच इमारतीच्या बाहेरील भिंतीवर लावलेल्या एसीच्या यूनीटवर बसून आरामात मोबाइल पाहात असल्याचे दिसत आहे. जणू काही तो गार्डनच्या बाकड्यावर बसला आहे. पण कहाणी इथेच संपत नाही. असे सांगितले जात आहे की, हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडशी चॅट करत होता. आता लोक म्हणत आहेत, “भाऊ, प्रेम असावे तर असे, नाहीतर दावे तर सरकारही करते.” सध्या सोशल मीडियावर हा Video तुफान Viral झाला आहे.

एसीच्या आउटडोअर युनिटवर बसून चॅट करताना दिसला प्रेमी!

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक तरुण बहुमजली इमारतीच्या भिंतीला बाहेर लावलेल्या एसी युनिटवर बसला आहे. त्याचे पाय मोकळे आहेत, कोणताही सेफ्टी बेल्ट त्याने लावलेला नाही, ना कोणता आधार घेतला आहे. जीव धोक्यात घालून तो मोबाइलमध्ये गुंतला आहे. जणू काही जगातील सर्वात महत्त्वाचे काम फोनवर करत आहे. असे सांगितले जात आहे की, तो तिथे बसून आपल्या गर्लफ्रेंडशी चॅट करत होता. एसी युनिटवर बसणे आधीच धोक्याचे असते, पण या तरुणाने तर जणू मृत्यूला खेळ बनवले आहे. ज्या उंचीवर तो बसला आहे, तिथून पडल्यास काहीही होऊ शकते. पण प्रेमाच्या नशेत हा तरुण पूर्णपणे बुडाला आहे. ना खाली पाहत आहे, ना आजूबाजूची पर्वा करत आहे.

वाचा: ‘काय, तुझं एका नेत्याशी लग्न झालंय?’, सोनाली कुलकर्णीच्या बहिणीला कळताच… काय आहे किस्सा

यूजर्स घेताहेत मजा

हा व्हिडीओ studentgyaan नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे आणि अनेकांनी लाइकही केले आहे. सोशल मीडिया यूजर्स व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे दिसत आहे. एका यूजरने लिहिले… प्रेम मृत्यूच्या जवळ नेते, पण मरू देत नाही. दुसऱ्या एका यूजरने लिहिले… अरे, कदाचित तो एसी दुरुस्त करण्यासाठी आला असेल. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले… साहेब, मृत्यूची भीती नाही, पण गर्लफ्रेंडची भीती वाटते.

काय आहे सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा व्हिडीओ हा एका एसी फिटिंग करणाऱ्या कामगाराचा असल्याचे म्हटले जात आहे. तो एसीचे आऊटडोअर यूनीट फिट करताना दिसत आहे. त्याने ते फिट केले. त्यानंतर तो तिथे मोबाईल पाहात बसला. सुरक्षेसाठी त्याने कंबरेला दोरी गुंडाळली आहे. ही दोरी वर गच्चीवर कशाला तरी बांधलेली असावी. पण हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.