25 वेळा पाहिलं पण मन भरलं नाही, तेरे इश्क में नाचेंगे गाण्यावर महिला डान्स, सिंपल स्टेपने लावलं वेड

तेरे इश्क में नाचेंगे गाण्यावर एका महिलेने केला असा डान्स की तिथे असणारे सर्वजण फक्त बघतच राहिले. महिलेच्या हटके डान्सने सगळ्यांनाच लावलं वेड.

25 वेळा पाहिलं पण मन भरलं नाही, तेरे इश्क में नाचेंगे गाण्यावर महिला डान्स, सिंपल स्टेपने लावलं वेड
| Updated on: Apr 19, 2026 | 4:22 PM

Viral Video : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सामान्य कुटुंबातील महिलांचा बहुतेक वेळ घर, मुलं, नोकरी आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात जातो. स्वतःसाठी वेळ काढणं त्यांच्यासाठी अवघड होतं. मात्र, या सगळ्यातूनही काही महिला आपल्या आवडी-निवडी जपत असतात. असेच काही महिलांचे हटके व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होतात. सध्या अशाच एका महिलेचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिच्या एनर्जीने आणि स्टाईलने सगळ्यांनाच अक्षरशः वेड लावलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक हौशी कलाकारांना स्वतःची कला सादर करण्याची मोठी संधी मिळाली आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण डान्स, गाणं किंवा अभिनयाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यापैकी काही व्हिडीओ इतके लोकप्रिय होतात की त्या व्यक्तींचं आयुष्यच बदलून जातं. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओही त्याच प्रकारातला आहे.

या व्हिडीओमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात काही महिला डान्स करताना दिसत आहे. मात्र, त्यामध्ये एका महिलेच्या नृत्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती महिला जुन्या बॉलिवूड गाण्यावर ‘तेरे इश्क में’ या गाण्यावर इतक्या जोशात आणि आत्मविश्वासाने डान्स करते की प्रेक्षक तिच्याकडे पाहतच राहतात. तिचे एक्सप्रेशन्स, स्टेप्स आणि जबरदस्त एनर्जी पाहून अनेकांनी तिला थेट ‘गौतमी पाटील’लाही टक्कर देणारी डान्सर असल्याचं म्हटलं आहे.

गौतमी पाटीलला टक्कर

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @deep.ikayadav9408 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तिच्या या डान्स व्हिडीओला लाखो-कोटींच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यामध्ये काही चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर खूपच सुंदर नाचली, काकू भारी आहेत, एनर्जी कमाल आहे, गौतमी पाटीललाही टक्कर देईल असा डान्स अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.

या व्हिडीओमुळे एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली आहे की कला कोणत्याही वयाची किंवा परिस्थितीची मोहताज नसते. योग्य संधी आणि आत्मविश्वास असेल तर कुणीही आपली ओळख निर्माण करू शकतो. सध्या या ‘डान्सिंग काकू’चा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून त्या रातोरात स्टार बनल्या आहेत.

 

Follow Us