बाहेरुन वाटली झोपडी, तरुणीने गुपचूप आत बोलवून नेले, आतील ते दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले

सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायलर होत आहे. या व्हिडीओत एक झोपडी सदृश्य जागा दिसत आहे. एक तरुणी आपल्याला या झोपडीतन जाताना दिसत आहे. तिच्या हातात कॅमेरा असल्याने हा नजारा आपल्याला पहायला मिळत आहे. या झोपडीत शिरल्यानंतर समोरील दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.....

बाहेरुन वाटली झोपडी, तरुणीने गुपचूप आत बोलवून नेले, आतील ते दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले
Amazing place
| Updated on: Jan 25, 2025 | 9:36 PM

काही गोष्टी बाहेरुन अनाकर्षक वाटत असतात. परंतू आत जाऊन पाहीले तर या गोष्टीचे महत्व कळत असते. साधारण वाटणाऱ्या गोष्टीत अनेक रहस्य लपलेली आढळतात. ही रहस्य एखाद्या महालात देखील नसतात. आज आपण असाच एक व्हिडीओ पाहणार आहोत. ज्यात वाळवंटी सदृश्य प्रातांत एक साधी दिसणारी झोपडी आपल्याला पाहायला मिळते. या झोपडीत एक तरुणी कोणालातरी गुपचूप घेऊन जाताना दिसते. आत एक लांबलचक भुयार आपल्याला पाहायला मिळते. कोणाच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की वाळवंटी प्रदेशात असे दृश्य पाहायला मिळेल.या झोपडी सदृश्य जागेत सर्व सोयी सुविधा होत्या. परंतू त्या रुममधील समोरचे दृश्य पाहून तुम्हाला दुसऱ्या जगात गेल्या सारखे वाटेल.

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केलेला आहे. लंडनच्या रहिवासी असलेल्या सँडी ब्रेटमायर  ( Sandy Breitmeier ) यांनी शूट केला आहे. या झोपडीकडे हाताने दिशा दाखवित सँडी म्हणते की आफ्रीकेतील ही जागा खुपच सुंदर आणि जादूनगरी प्रमाणे आहे.चला तुम्हाला या झोपडीत काय आहे ते दाखवते. यात एक लांबलचक भूयारी मार्ग आहे.येथे मला माझे शूज काढावे लागणार आहेत. कारण येथे तशा सूचना लिहील्या आहेत. बुट काढल्याने पायचा आवाज होणार नाही. आता मी या खोलीत शिरत आहे. त्यानंतर कळाले की वास्तविक मी जंगल सफारीच्या आत पोहचली आहे.जेथे पाण्यात वन्य प्राणी पाणी पिताना दिसत आहेत. या जागेत वन्यप्राण्यांना आपण दिसत नाही. त्यामुळे ते निर्धास्त मजा करत असतात. तु्म्ही काचेच्या खिडकीतून त्यांचे फोटोही काढू शकता.

सँडी हीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ती लिहते की केनियामध्ये मला आलेल्या सर्वोत्तम अनुभवांपैकी हा एक होता. त्सावो वेस्ट नॅशनल पार्कमधील या गुप्त झोपडीचा अनुभव मी अजूनही विसरू शकत नाही. सँडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २ कोटी ५२ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, ५ हजार ६०० हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. टोनिया नावाच्या एका युजरने लिहिले आहे की हे खरोखर खूप सुंदर आहे. तुम्ही सांगत आहात त्यापेक्षाही जास्त सुंदर. केनिया खरोखरच सुंदर आहे.दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की त्या प्राण्यांना माहित नाही तुम्ही तिथे आहात, परंतु त्यांना तुमच्यापासून कोणताही धोका नाही. म्हणूनच ते आरामात पाण्यात मजामस्ती करीत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

जर तुम्हाला सिंह पहायचे असतील तर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत वाट पहावी लागेल असे सँडीने या व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे. पण ते रात्री किंवा खूप दिवसांनी येतात. अशा परिस्थितीत वाट थोडी जास्त पहावी लागेल. त्यांच्या या माहितीवर एका महिला युजरने लिहिले आहे की मला बाबा सिंहांची वाट पाहायची नाही, कारण मी त्यांचे अन्न बनू शकते. त्याच वेळी, गॅबी रॅमवेल यांनी लिहिले आहे की प्राणीसंग्रहालये आता इतिहासजमा झाली आहेत. आता अशा पद्धतीने प्राण्यांना जवळून पाहण्याचा योग्य मार्ग आहे. आपण त्यांच्या घरी पोहोचू आणि त्यांना कळणार देखील नाही. सँडीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओ १९ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर १ लाख ४३ हजारांहून अधिक वेळा हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.