चिमुरडीचा डोकं चक्रावणारा स्टंट, 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेला जबरदस्त Video

| Updated on: Nov 22, 2021 | 3:08 PM

सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजीचा ट्रेंड खूप वाढला आहे. कधी-कधी काही लोक असे स्टंट करतात, की कोणाचेही केस उभे राहतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

चिमुरडीचा डोकं चक्रावणारा स्टंट, 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेला जबरदस्त Video
चिमुरडीचा अमेझिंग स्टंट
Follow us on

सध्या इंटरनेटवर स्टंटबाजीचा एक व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. खरं म्हणजे हा स्टंट कोणी अनुभवी व्यक्तीने केलेला नसून एका चिमुरड्या मुलीने केला आहे. मात्र, हा व्हिडीओ फेक असल्याचं आता काही नेटकरी म्हणू लागले आहेत, त्यामुळे इंटरनेटवर वाद सुरु झाला आहे. हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. कारण व्हिडिओमध्ये ही चिमुरडी ज्या पद्धतीने रॅम्पवर बाईक पलटवताना दिसत आहे, ते पाहिल्यानंतर कोणती मुलगीही हे करू शकते. यावर विश्वास बसणार नाही. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आताप-र्यंत हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजीचा ट्रेंड खूप वाढला आहे. कधी-कधी काही लोक असे स्टंट करतात, की कोणाचेही केस उभे राहतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, यूजर्स याला फेक म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी 4 चाकी बाईकवर स्टंट करत आहे. व्हिडिओमध्ये एक रॅम्प दिसत आहे, ज्यावरून मुलगी बाईक पलटी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र, बहुतांश युजर्सचे म्हणणे आहे की बाईकवर मुलगी नसून एक बाहुली ठेवण्यात आली आहे.

चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.

हा स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सेल्मामोर्दोव्स्काया नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वास्तविक की फेक… हे समजण्यासाठी मला 5 वेळा व्हिडिओ पाहावा लागला.’ आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडिओ 3 ऑक्टोबर रोजी अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. हा व्हिडिओ जितका धक्कादायक आहे तितकाच तो चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश लोक तो खोटा असल्याचे सांगत आहेत. लोक म्हणतात की बाइक रिमोट कंट्रोलने चालवली जात होती. त्यावर मूल नसताना, त्यावर एक बाहुली ठेवण्यात आली होती.

मात्र, काही युजर्सनी मुलीबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये मुलीबद्दल विचारत आहेत की तिला कंबरेला कोणतीही दुखापत झाली नाही का. मात्र या व्हिडीओला फेक ठरवून अनेकांनी त्यामागे तर्कवितर्क लावले आहेत. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, तर तुम्हाला स्वतःला समजेल की बाईकच्या वर खरोखरच एक मूल नव्हते, तर एक बाहुली होती. तिच्या जागी मूल असते तर कदाचित तिला दुखापत झाली असती.

हेही पाहा:

Viral: माकडाच्या पिलासोबत आईचा व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले, आई, पाहा काय करते!

Video: या चिमुरड्यांमधील निरागसपणा माणसांना खूप काही शिकवून जातो, व्हिडीओ पाहा जाणीव होईल!