उफ्फ ये जुल्फे और प्रकृती का स्पर्श! सिंहाचे केस बघून तुम्हाला हेवा वाटेल…

हा सिंह इतका स्वॅग मध्ये बसला आहे की त्याला काहीच तोड नाही.

उफ्फ ये जुल्फे और प्रकृती का स्पर्श! सिंहाचे केस बघून तुम्हाला हेवा वाटेल...
lion
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 03, 2022 | 11:00 AM

सिंहाच्या सामर्थ्यापुढे जंगलातील मोठमोठे प्राणीही झोपी जातात. मात्र, या भयाण प्राण्याचे एक सुंदर रूपही आहे, जे तुम्हालाही नक्की आवडेल. हा व्हिडीओ बघून तुम्ही म्हणाल, खरंच निसर्ग किती अद्भुत आहेना ज्याने असे भव्य आणि आश्चर्यकारक जीव निर्माण केले. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही जंगलाच्या राजाचे सुंदर केस हवेत फडफडताना दिसतात. हा सिंह इतका स्वॅग मध्ये बसला आहे की त्याला काहीच तोड नाही. असं वाटतं जणू काही सिंहली पण कल्पना आहे की तो इतक्या मोठ्या जंगलाचा राजा आहे. शॅम्पूची जाहिरात करतोय की काय असाही प्रश पडतो!

हा सुंदर व्हिडिओ 1 डिसेंबर रोजी @Gabriele_Corno ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला होता, ज्यात आपण सिंहला मस्त आभाळाखाली बसलेले पाहू शकतो.

त्याचे केस खूप दाट आहेत, जसा वारा वाहतो तसं या सिंहाचे केस मस्त हवेत उडत असतात. त्याच्याकडे बघून आपलंच मन प्रसन्न होतं.

जंगलातील या आश्चर्यकारक क्लिपला 2.2 लाख व्ह्यूज आणि 21 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो युझर्सनीही प्रतिसाद दिला आहे.

एका व्यक्तीने कमेंट केली, “हा शॅम्पू ब्रँडसाठी जाहिरात करत आहे”. दुसऱ्याने लिहिले की त्याचे केस किती अद्भुत आहेत. अनेक युझर्सनी सिंहाच्या केसांचं आणि स्टाइलचं कौतुक केलं.