आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदचं केलं हटके अभिनंदन! लोक म्हणाले- क्या बात है सर जी

एका युजरने प्रज्ञानंदचं कौतुक करत कमेंट केली आहे, 'संपूर्ण देशाला प्रज्ञानंदचा अभिमान आहे. उज्ज्वल भविष्य त्याची वाट पाहत आहे.' आणखी एका युजरने लिहिले की, 'तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात. तुमच्या या प्रवासात तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व जण आलो आहोत.'

आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदचं केलं हटके अभिनंदन! लोक म्हणाले- क्या बात है सर जी
Praggnanandhaa
| Updated on: Aug 25, 2023 | 9:48 PM

मुंबई: कोणताही सामना जिंकल्याशिवाय किंवा हरल्याशिवाय नसतो. खेळात कुणी हरतं तर कुणी जिंकतं, पण कधी कधी असं होतं की एखादा खेळाडू पराभूत झाल्यानंतरही विजेत्यापेक्षा जास्त चर्चेत राहतो, त्याचं जगभर कौतुक होऊ लागतं. सध्या भारताचा प्रज्ञानंदही याच श्रेणीत आहे. जग त्याचं कौतुक करत आहे. प्रज्ञानंद हा बुद्धिबळपटू असून तो 2023 च्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. फायनलमध्ये त्याला जगातील नंबर वन बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने पराभूत केले असले तरी कार्लसनपेक्षा ही अधिक आक्रमक खेळाडू अजूनही चर्चेत आहे.

 आपण सगळे पुन्हा तिथे येऊ

उद्योगपती आनंद महिंद्रा हे देखील प्रज्ञानंदच्या खेळाचे चाहते झाले आहेत. त्यांनी ट्विट करून प्रज्ञानंद यांना प्रोत्साहन देत लिहिलं आहे की, ‘तू ‘रनरअप’ प्रज्ञानंद नाहीस. ही फक्त सोन्याकडे आणि महानतेकडे तुमची ‘रन-अप’ आहे. अनेक लढाया लढण्यासाठी आपल्याला अधिक शिकण्याची आणि जगण्याची आवश्यकता असते. तू शिकलास आणि तु पुन्हा लढशील; आणि आपण सगळे पुन्हा तिथे येऊ… आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ.” आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत आणि लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

संपूर्ण देशाला प्रज्ञानंदचा अभिमान

एका युजरने प्रज्ञानंदचं कौतुक करत कमेंट केली आहे, ‘संपूर्ण देशाला प्रज्ञानंदचा अभिमान आहे. उज्ज्वल भविष्य त्याची वाट पाहत आहे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात. तुमच्या या प्रवासात तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व जण आलो आहोत.’ काही युजर्स आनंद महिंद्रा यांच्या ट्विटचे कौतुक करत आहेत, ‘क्या खुब कहा सर जी’.

गुणी तरुणाला आशीर्वाद द्या!

यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल प्रज्ञानंदचे अभिनंदन केले होते आणि लिहिले होते की, ‘माझी छाती अभिमानाने फुलली आहे. या गुणी तरुणाला आशीर्वाद द्या! भविष्यातही तो बुद्धिबळ विश्वात आपले नाव उज्ज्वल करत राहो.’