आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त फोटो शेअर केलाय! पाहिला? प्रचंड व्हायरल

हे आपल्यालाही दिसतं आणि ही गोष्ट स्वतः आनंद महिंद्रा सुद्धा बोलून दाखवतायत.

आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त फोटो शेअर केलाय! पाहिला? प्रचंड व्हायरल
anand mahindra
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 10, 2022 | 5:05 PM

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि अनेकांना प्रोत्साहन देत असतात. अनेकदा ते आर्थिक दुर्बल लोकांना मदत करताना दिसलेत. बरेचदा ते लोकांना चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न करतात.सध्या त्याचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालंय. ज्याद्वारे त्याने बुटांची एक जाहिरात शेअर केली आहे.

खरं तर, त्यांनी ट्विटरवर एक जाहिरात शेअर केली आहे आणि ती एकदम वेगळी आहे. हे आपल्यालाही दिसतं आणि ही गोष्ट स्वतः आनंद महिंद्रा सुद्धा बोलून दाखवतायत.

“जेव्हा जाहिराती त्यांच्या कार्यात्मक, व्यावसायिक हेतू आणि कला या सीमांच्या पलीकडे जातात.” असं कॅप्शन देऊन आनंद महिंद्रा यांनी हे जबरदस्त ट्विट शेअर केलंय. या चित्रात नायके शूज कंपनीची जाहिरात आणि नायके शूज कंपनीची टॅगलाइन दिसत आहे.

खरं तर या चित्रात एका हँडलच्या माध्यमातून दोन बूट लटकविण्यात आले आहेत. हे बूट ज्या पद्धतीने लटकवले आहेत तो आकार फुफ्फुसाचा आकार वाटतो. जसं फुफ्फुस माणसाच्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे तसेच आणि तितकेच हे बूट सुद्धा महत्त्वाचे आहेत असा संदेश या फोटोत आहे.

ही जाहिरात आता खुद्द आनंद महिंद्रा यांनीच शेअर केली असून ती जोरदार व्हायरल होत आहे. लोकही यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.