
सर्व लोकांना लोकप्रिय ब्रँड खरेदी करायचे आहेत. अनेकदा न पाहताच लोक बनावट ब्रँडचे कपडे किंवा बूट खरेदी करण्यासाठी येतात. कॉपी करणारी कंपनी अशा काही डिझाईन्सची रचना करते, जे अगदी वास्तविक ब्रँड्स आहेत की काय असं वाटतं. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अशाच एका प्रॉडक्टचा फोटो शेअर केला आहे, ज्यात स्पोर्ट्स ब्रँड ॲडिडासचं ब्रँडिंग आहे, पण ज्यात मजेशीर ट्विस्ट आहे. महिंद्रा ग्रुपच्या अध्यक्षांनी ट्विटरवर अपलोड केलेल्या या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा बूट आहे जो ॲडिडास शूजसारखा दिसत आहे. ज्यात त्याचा लोगो आणि थ्री-स्ट्राइप ट्रेडमार्क आहे.
बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की, बनावट बुटांवर आदिदासला ‘अजितदास’ असे लिहिण्यात आले आहे. हे नाव पूर्णपणे तर्कशुद्ध आहे, अशी गंमत आनंद महिंद्रा यांनी केलीये.
Completely logical. It just means that Adi has a brother called Ajit. Vasudhaiva Kutumbakam? ? pic.twitter.com/7W5RMzO2fB
— anand mahindra (@anandmahindra) November 22, 2022
आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘याचा सरळ अर्थ असा आहे की आदिला अजित नावाचा भाऊ आहे. वसुधैव कुटुंबकम?” या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि वापरकर्त्यांकडून प्रतिक्रियांचा भडिमार सुरू केला. एका युझरने आदिदाससारखा दुसरा टी-शर्ट दाखवला, त्यात आदिदासऐवजी कालिदास लिहिलेला होता.
ही पोस्ट पाहून अनेक युझर्सनी मस्करीत पोस्ट लिहायला सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, “आदि म्हणजे प्रथम, अजित म्हणजे अजिंक्य. काहीतरी संबंधित वाटते.
आणखी एका युझरने ही पोस्ट पाहून लिहिले की, “कदाचित आदिदासचा भाऊ कुंभमेळ्यात कुठेतरी हरवला असेल. आता बुटाच्या ब्रॅण्डमध्ये ते एकमेकांना भेटलेत”.