Video : भर वरातीत आमदाराने बिचाऱ्या ड्रायव्हरचा केला अपमान; सर्वांसमोर ड्रायव्हरला मारली लाथ, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

आमदार गाडीच्या सनरूफवरून बाहेर उभे राहून लोकांना हात दाखवत होता अभिवादन करत होता. पण अचानक तो ड्रायव्हरच्या दिशेने पाय उगारताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरूवात झाली आहे.

Video  : भर वरातीत आमदाराने बिचाऱ्या ड्रायव्हरचा केला अपमान; सर्वांसमोर ड्रायव्हरला मारली लाथ, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
| Updated on: Nov 29, 2026 | 2:30 PM

बिहारचे आमदार अनंत सिंह सध्या आपल्या मुलीच्या शाही लग्नामुळे चर्चेत आहेत. लग्नातील लाखोंची गर्दी, शेकडो पदार्थांची मेजवाणी, महागड्या गाड्या आणि घोड्यांच्या शर्यतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता याच लग्नातील आणखी एका व्हिडिओने वेगळाच विषय चर्चेत आणला आहे. गाडीच्या सनरूफवरून बाहेर उभे राहून लोकांना हात दाखवत असल्याचे दिसते. पण अचानक ते ड्रायव्हरच्या दिशेने पाय उगारताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरूवात झाली आहे.

आधी गमछ्याने मारलं, नंतर लाथ मारल्याचा दावा

व्हायरल व्हिडिओमध्ये अनंत सिंह एका suv सनरूफमधून बाहेर उभे असल्याचं दिसतं. त्यांच्या गाडीच्या आजूबाजूला पाहुणे आणि समर्थकांची मोठी गर्दी आहे. आमदार अनंत सिंह हात हलवून लोकांना अभिवादन करत आहे. स्वीकारत आहे. पण काही त्याच काही मिनिटांत त्यांनी असं काही केलं की सोशल मीडियावर टिका होत आहे.

Loading...

व्हिडिओमध्ये ते आधी आपल्या हातातील गमछा ड्रायव्हरच्या दिशेने फिरवताना दिसतात. त्यानंतर ड्रायव्हरला लाथ मारल्यासारखी कृती करताना दिसतात. विशेष म्हणजे हा प्रकार घडत असतानाही ते गाडीच्या सनरूफमधून बाहेर उभे राहून गर्दीला अभिवादन करत राहतात. मात्र ड्रायव्हारसोबत नेमकं काय घडलं, त्याला दुखापत झाली का किंव अनंत सिंह यांनी असं का केलं. याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

 

सोशल मीडियावर चर्चा

अनंत सिंह यांच्या मुलीचं नाव शिवांगी सिंह असून तिचा विवाह 25 नोव्हेंबर रोजी ऋषिकेश कुमार उर्फ अंकित यांच्याशी झाला. पाटणा जिल्ह्यातील नदंवा या अनंत सिंह यांच्या मूळ गावी हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर पाहुणे जमले होते. आता ड्रायव्हरसोबतच्या कथित वर्तनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या वर्तनावर नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही जण व्हिडिओमागचं नेमकं कारण काय असा प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत अनंत सिंह किंवा त्यांच्या ड्रायव्हरकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आल्याची माहिती नाही. त्यामुळे व्हायरल व्हिडीओतील दृश्यांवरूनच सध्या हा विषय चर्चेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us