Baba Vanga Prediction : उन्हामुळे शरीराची लाही लाही, पाऱ्याचा काटा तुटणार? बाबा वेंगाची ती भयावह भविष्यवाणी

Baba Vanga Prediction : बल्गेरियाची भविष्यवेत्ती बाबा वेंगाच्या अनेक भविष्यवाण्या प्रसिद्ध आहेत. तिच्या शिष्यांनी तिचे भाकीत गूढ काव्यात ओवी बद्ध करून ठेवले आहे. पृथ्वीवरील वाढत्या तापमानाविषयी तिने मानवाला मोठा इशारा दिला आहे.

Baba Vanga Prediction : उन्हामुळे शरीराची लाही लाही, पाऱ्याचा काटा तुटणार? बाबा वेंगाची ती भयावह भविष्यवाणी
बाबा वेंगाची भविष्यवाणी
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 23, 2025 | 5:12 PM

बाबा वेंगा हे नाव आता अनेकांच्या तोंडी आहे. इंटरनेटवर तिची भाकीत अनेकजण शोधतात. ती मुळची बल्गेरियातील आहे. वांगेलिया गुस्ताव पंडेवा असे बाबा वेंगाचे पूर्ण नाव आहे. वेंगा म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्ती. आजी अथवा आजोबा. तर या बाबा वेंगाच्या नावावर अनेक भविष्यवाण्या प्रसिद्ध आहेत. त्यात अमेरिकेवरील हल्ला, इसिसचा उदय यासह चीन आणि रशियातील घडामोडींच्या भाकि‍तांचा समावेश आहे. युरोपातील अनेक देशात मुस्लिम राजवट येईल असं भाकीत सुद्धा तिने वर्तवले आहे. तर जगात सातत्याने तापमान वाढ होत आहे. पृथ्वीवरील वाढत्या तापमानाविषयी तिने मानवाला मोठा इशारा दिला आहे.

पाऱ्याचा काटा तुटणार?

Baba Vanga ने वर्ष 2025 मध्ये जागतिक तापमानाविषयी मोठी भविष्यवाणी केली. यावर्षी उष्णतेच्या झळांनी मानव हैराण होईल, असे भाकीत वेंगाने केले आहे. पाऱ्याचा काटा तुटेल असे भाकीत तिने केले. गूढ काव्यानुसार, पारा 52 अंशांच्या पुढे जाईल. त्यावेळी पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येईल. सध्या एप्रिल महिन्यातच पारा खूप वाढला आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेने तीन वर्षांतील सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहे. मे महिन्यात काय स्थिती राहील या प्रश्नानेच अनेकांना घाम फोडला आहे.

बाबा वेंगा हिने अनेक गूढ भाकीतं केली आहेत. हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवर येणार ताण यावर अनेक वैज्ञानिकांनी जगाला इशारा दिला आहे. Intergovernmental Panel on Climate Change (IPCC ) च्या एका अहवालानुसार, जागतिक तापमान वाढीचा वेग जर आवरला नाही तर 2100 पर्यंत 40 टक्के लोकसंख्येला जल संकटाला सामोरे जावे लागेल. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, 2050 पर्यंत 1.8 अब्ज लोकांना गंभीर पाणी संकटाला तोंड द्यावे लागेल. या दरम्यान योग्य उपाय योजना केल्या नाही तर जागतिक तापमानात 2°C ची वाढ दिसेल.

AI ची भविष्यवाणी ठरली खरी?

अनेक वर्षांपूर्वी बाबा वेंगाने AI विषयी मोठी भविष्यवाणी केली होती. हे भाकीत सत्य ठरत आहे. सध्या जगभरात कृत्रिम प्रज्ञेची जोरदार चर्चा आहे. चीनने तर या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. सर्वच क्षेत्रात एआयमुळे मोठी क्रांती होत आहे. आरोग्य क्षेत्रात तर मोठा बदल झाला आहे. परदेशात एआयच्या मदतीने रोगाचे निदान झटपट होत आहे. डॉक्टरांपेक्षा एआय तंत्रज्ञानामुळे रोगांचे झटपट निदान होत आहे. त्यावरील गुणकारी औषधांची यादी पण समोर येत आहे. तर इतर क्षेत्रात पण एआयने मोठी प्रगती साधली जात आहे. शिक्षण क्षेत्रापासून व्यापारी क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात एआयची मोठी मदत होत आहे.

डिस्क्लेमर : बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.