AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : अवघ्या काही तासातच सोन्यात 3900 रुपयांची स्वस्ताई; 55 हजारांपर्यंत खरंच झरझर येणार खाली, खरी ठरणार ती भविष्यवाणी?

Gold Price Reduce : देशातील सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याने एक लाखांचा टप्पा ओलांडला. वायदे बाजारातही सोन्याने नवीन विक्रम केला. वायदे बाजारात सोने घसरले आहे. मग खरंच सोने 55 हजार रुपयांपर्यंत घसरेल का? काय आहे ती भविष्यवाणी? केली कोणी?

Gold Rate : अवघ्या काही तासातच सोन्यात 3900 रुपयांची स्वस्ताई; 55 हजारांपर्यंत खरंच झरझर येणार खाली, खरी ठरणार ती भविष्यवाणी?
सोन्याच्या किंमती येणार जमिनीवर?Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 23, 2025 | 4:04 PM
Share

सोन्याची किंमत पुन्हा एका घसरण दिसून आली. मंगळवारपासून ते आतापर्यंतच्या व्यापारी सत्रात वायदे बाजारात सोन्याने पिछे मूडचा नारा दिला. सोने अवघ्या काही तासात 3,900 रुपयांनी घसरले. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमती उच्चांकावर होत्या. त्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्री सत्र सुरू केले. दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये पण वाढ दिसत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होत आहे. चीनच्या नवीन खेळीमुळे सुद्धा बाजारात सोन्याचे दाम घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वायदे बाजारात सोने घसरले आहे. मग खरंच सोने 55 हजार रुपयांपर्यंत घसरेल का? काय आहे ती भविष्यवाणी? केली कोणी?

मॉर्निंगस्टारचे भाकीत काय?

मॉर्निंगस्टारच्या अहवालानुसार, काही वर्षात सोन्याच्या किंमती 55 हजार रुपयांच्या घरात येतील. अमेरिकेतील मॉर्निंगस्टारचे तज्ज्ञ जॉन मिल्स यांना आशा आहे की, सोन्याच्या किंमती सध्याच्या स्तरावरून घसरून 1,820 डॉलर प्रति औंस होतील. त्यासाठी या अहवालात अनेक घटकांचा आणि कारणांचा उल्लेख केला आहे.

या अहवालानुसार, सोन्याचे उत्पादन वाढले आहे. 2024 मधील दुसर्‍या तिमाही अहवालात खाण लाभ 950 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहचला आहे. ग्लोबल रिझर्व्ह 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन इतका झाला आहे. ऑस्ट्रेलियात उत्पादन वाढले आहे. तर इतर ठिकाणांहून पण सोन्याची आवक वाढली आहे. अमेरिकेतील केंद्रीय बँकेने गेल्या वर्षी 1,045 टन सोने खरेदी केले होते. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या सर्वेनुसार, सेंट्रल बँक सोन्याचा साठा कमी करणे अथवा आहे तो सांभाळणे अशी योजना असण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येऊ शकते.

दुसरीकडे व्यापारी युद्धाला सध्या ब्रेक मिळाला आहे. तीन महिने ट्रम्प सरकारने टॅरिफ धोरणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे वायदे बाजारात जूनमधील सौदे एक लाखांचा आकडा गाठू शकणार नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतींनी मंगळवारी एक लाखांचा टप्पा पार केला होता. त्यामध्ये जीएसटीचा समावेश नव्हता.

वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण

देशातील वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. बुधवारी सोने 11 वाजू 15 मिनिटांवर सोन्यात 1800 रुपयांची घसरण होऊन ते 95,536 रुपयांवर आले. तर सकाळी सोने जवळपास एक हजार रुपयांच्या घसरणीसह 96,500 रुपयांवर उघडले. व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतीत जवळपास 1900 रुपयांच्या घसरणीसह 95,457 रुपयांच्या निम्नतम पातळीवर पोहचले. एप्रिल महिन्यात सोन्याच्या किंमतीत 4,700 रुपयांची वाढ दिसली.

मॉर्निंग स्टारच्या अहवालानुसार खरंच सोन्याच्या किंमतीत घसरण होईल का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. कारण सोने सतत उसळी घेत आहे. सोन्याने एक लाखांचा टप्पा पार केल्याने सराफा बाजारात खरेदीदारांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी मंदावेल आणि किंमती पुन्हा एक लाखांपेक्षा कमी होतील अशी शक्यता आहे.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....