Online Jeans मागवली, कांद्याची पिशवी आली! या App वरून केली होती शॉपिंग

'हॅलो, मी तक्रार दाखल करण्यापूर्वी, मी मागवलेल्या जीन्सऐवजी मला कांद्यासह पार्सल का मिळाले, हे तुम्ही सांगू शकाल का?'

Online Jeans मागवली, कांद्याची पिशवी आली! या App वरून केली होती शॉपिंग
Onion came instead of jeans
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 18, 2022 | 1:26 PM

महागड्या वस्तू ऑनलाइन मागवणाऱ्या लोकांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, पण वस्तू आल्या की ज्या मागविल्या आहेत त्या बदल्यात साबण, विटा किंवा इतर वेड्यावाकड्या वस्तू मिळतात. अलिकडेच एका महिलेसोबत अशीच एक घटना घडली जेव्हा तिने ऑनलाइन ब्रँडेड जीन्सची ऑर्डर दिली पण त्याऐवजी कांद्याने भरलेली पिशवीच घरी आली.

एका मुलीने Depop App वरून ब्रँडेड जीन्स ऑर्डर केली होती. जेव्हा तिच्या घरी एक पॅकेज आलं तेव्हा तिला वाटलं की ही तिची ब्रँडेड जीन्स आहे, परंतु तिला जीन्सऐवजी छोट्या कांद्याने भरलेले पॅकेज देण्यात आले.

वेबसाइटवर दिसणारा माल पाठवल्याचा दावा करणाऱ्या विक्रेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. औपचारिक तक्रार दाखल करण्यापूर्वी ग्राहकाने विक्रेत्याला मेसेज केला. तेव्हा पॅकेजमध्ये जीन्स ऐवजी कांद्याची पिशवी कशी आली याची कल्पना नसल्याचं विक्रेत्याने म्हटलं.

ग्राहकाने त्या विक्रेत्याला एक मजकूर शेअर केला, ज्यात लिहिले होते, ‘हॅलो, मी तक्रार दाखल करण्यापूर्वी, मी मागवलेल्या जीन्सऐवजी मला कांद्यासह पार्सल का मिळाले, हे तुम्ही सांगू शकाल का?’

यावर उत्तर देताना विक्रेत्याने लिहिले, “सॉरी, मी खरंच गोंधळून गेलोय; मी जीन्सच पाठवली होती.” त्यानंतर खरेदीदाराने पॅकेजचा फोटो अपलोड केला, त्यात तळाशी लहान कांद्याने भरलेला बॉक्स दाखवला.