
सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळीसाठी लोक जोरदार खरेदी करतायत. खरेदीदारांपासून ते विक्रेत्यांपर्यंत सगळेच दिवाळीच्या रंगात रंगलेलेही दिसतात. दरम्यान, एका दुकानाबाहेर असा पुतळा दिसला की तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि आनंद घेतायत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दुकानाबाहेर एक पुतळा उभा असल्याचं पाहायला मिळतंय. या पुतळ्याचे स्वरूप हुबेहूब बराक ओबामांसारखे दिसते. आता दुकानदाराने मुद्दामच हा देखावा केला आहे की तसा झाला आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण पुतळा एकदम प्रेक्षणीय वाटतो.
हा पुतळा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं, हा फोटो अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केलाय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा बनवलेला हा पुतळा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
तिथून जाणारे लोक या पुतळ्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. विशेष म्हणजे बराक ओबामा यांना डोळ्यासमोर ठेवूनच हा पुतळा खऱ्या अर्थाने तयार करण्यात आला आहे.
obama’s Diwali party outfit pic.twitter.com/Ny7c1Jl6le
— vibes are ?!?!?!?! (@lilcosmicowgirl) October 18, 2022
तसे पाहिलं तर जगभरात प्रसिद्ध लोकांचे पुतळे खूप बनवले जातात आणि संग्रहालयांमध्ये ठेवण्यात येतात. पण अशा प्रकारचे पुतळे कपडाच्या दुकानाबाहेर आणि तेही भारतात प्रथमच दिसत आहेत. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.