दारूचा ट्रक पलटी अन् तळीरामांची दिवाळी! बाटल्या लुटण्यासाठी जमली प्रचंड गर्दी, VIDEO VIRAL

बिहारमधील अरारिया जिल्ह्यात दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा मिनी ट्रक डिव्हायडरला धडकून पलटी झाला. यानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ट्रकमधील बाटल्या आणि पेट्या घेऊन जात असल्याचा VIDEO व्हायरल झाला.

दारूचा ट्रक पलटी अन् तळीरामांची दिवाळी! बाटल्या लुटण्यासाठी जमली प्रचंड गर्दी, VIDEO VIRAL
bihar viral video
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 06, 2026 | 6:20 PM

बिहारमध्ये एक मोठा ट्रक पलटी झाला.मग त्यानंतर लोकांची प्रचंड झुंबड उडाली. अहो की लोक काय मदतीला धावून नाही गेली. तर गेली ती त्या ट्रकमधील सामान लुटायला.. तुम्ही आता त्यात काय नवीन म्हणाल. पण त्या ट्रकमध्ये काय साधं सुद सामान नव्हतं. तर चक्क दारूच्या बाटल्या होत्या, मग काय झाली ना तळीरामांची दिवाळी सुरू, कोणी बाटल्या उचलल्या तर कोणी थेट अक्खा बॉक्सच लंपास केला.

हा सगळा प्रकार बिहारमधल्या अरारिया जिल्ह्यातील खरहट टोल प्लाझाजवळ घडला. दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा एक मिनी ट्रक रस्त्यावरील डिव्हायडरला धडकला आणि हा अपघात झाला.अपघाताच्या मोठा आवाजाने आजूबाजूचे
गावकरी बाहेर आले. दारूच्या बाटल्या आणि दारूचा वास सगळीकडे पसरला होता.त्यामुळे लोकांनी एक मिनिट सुद्धा फुकट न घालवता दारूच्या बाटल्या लंपास केल्या.

Loading...

हळूहळू ही बातमी आजूबाजूच्या संपूर्ण गावात पसरली आणि लोकांची तोबा गर्दी जमली. त्यांच्या सर्वांच्या नजरा त्या दारूच्या बाटल्यांवर त्यामुळे ड्रायव्हरचं काय झालं असेल याची कोणी साधी चौकशीही नाही केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काहीजण बाटल्या हातात घेऊन जाताना दिसत आहेत तर काही लोकांनी चक्क पेट्यांच्या पेट्या हातात उचलल्या आहेत.

आता सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे 2016 पासून बिहारमध्ये दारू विकण्यास बंदी आहे. म्हणजे काय दारू व्रिक्रि – खरेदी आणि सेवनावर बंदी असलेल्या राज्यात जर दारूचा अक्खा ट्र्कच आडवा झाला.मग बिहारच्या लोकांसाठी हिच दिवाळी झाली की नाही? सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स पाऊस पडलाय तर काही ठिकाणी हशा पिकल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओचा आनंद कमेंट सेक्शनमध्ये लूटला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us