
जगात विविध प्रकारच्या वन्यजाती प्रजाती आहेत. काही लोकांना माहीत आहेत. तर काही लोकांना माहीत नाहीत. साप हा त्यापैकीच एक प्राणी. तसा तो शेतकऱ्यांचा मित्र. शेतात तुम्हाला साप हमखास दिसतीलच दिसतील. मोकळ्या रानात हा जीव नेहमी दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची नेहमीच सापांशी गाठ पडते. काही शेतकरी त्यांना जीवे मारतात. तर काही शेतकरी त्यांना सोडून देतात. साधारणपणे शेत, जंगल आणि गवताच्या मैदानात तसेच झाडाझुडूपांमध्ये साप आढळतात. बरेच लोक साप पाहून बिथरतात. घाबरून चिंगाट पळतात. तर काही लोक सापाला लिलया पकडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सापाचाच हा व्हिडीओ आहे. पण हा साधासुधा साप नाहीये. मात्र, या व्हायरल व्हिडीओत किती तथ्य आहे, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.
या व्हायरल व्हिडीओत एक शेतकरी त्याच्या शेतात काम करताना दिसत आहे. शेतात खड्डा खोदताना आधी फुस्स आवाज येतो. त्यामुळे शेतकरी दचकून मागे होतो. तेव्हा अचानक एक भला मोठा नाग बाहेर येतो. तो फणा काढून फुस्स करू लागतो. शेतकरी त्याला फावड्याच्या मदतीने हटवताना दिसत आहे. हा साप पाहून सर्वच हादरले. शेतकऱ्याने सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण साप काही जागचा हल्ला नाही. त्यामुळे काही लोकांनी त्याचा सेल्फी काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा साप हळूहळू झाडाच्या दिशेने गेला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निळ्या रंगाचा साप पाहून सर्वच थक्क झाले. काहींची तर घाबरगुंडी उडली.
तेव्हा साप बाहेर येतो
साप पकडणाऱ्या सर्प मित्राच्या मते अशा प्रकारचे निळे साप फार कमी दिसतात. पावसाळा संपल्यावर किंवा वातावरण बदलल्यानंतर हे साप बाहेर येतात. शेतकरी आणि ग्रामस्थांना सल्ला राहील की त्यांनी या सापांपासून दूर राहिलं पाहिजे. या सापांना मारू नये. तुम्हाला असा साप आढळला तर थेट वन विभागाला कळवा. म्हणजे ते त्याला त्याच्या अधिवासात सोडतील, असं या सर्प मित्राचं म्हणणं आहे.
आश्चर्य आणि शंका
निळ्या रंगाच्या सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नेटिजन्स तर या सापाचा रंग पाहून थक्क झालेत. अशा प्रकारचा सुंदर साप खरोखरच असतो का? असे सवाल नेटिजन्सकडून केले जात आहेत. हा खरोखरचा साप आहे की एआयची कमाल आहे? अशी शंकाही नेटिजन्स घेत आहे. तर काहींच्या मते सापाचा रंग फिल्टरच्या मदतीने बदलला गेला आहे. आता काय खरं काय खोटं हे तज्ज्ञच सांगतील. पण निळ्या रंगाच्या सापाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आश्चर्य आणि शंका दोन्ही व्यक्त केल्या जात आहेत.