Video: विकी-कतरिनाच्या प्रेमकहाणीच्या चर्चेत आता गाड्यांची एन्ट्री, दोघांच्याही गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दोघांचेही सोबत फोटो आणि व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात. अलीकडेच सुप्रसिद्ध फोटोग्राफर 'yogenshah_s' ने इंस्टाग्रामवर कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या कारच्या नंबर प्लेटचा फोटो शेअर केला आहे.

Video: विकी-कतरिनाच्या प्रेमकहाणीच्या चर्चेत आता गाड्यांची एन्ट्री, दोघांच्याही गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
कतरिना कैफ, विकी कौशल
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 5:51 PM

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चर्चेत आहेत. दोघेही ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झालेत, त्यानंतर सर्वत्र एकच गोष्ट आहे की, ते एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांनीही या नात्याला दुजोरा दिलेला नाही. त्यातच दोघेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहेत. आता पुन्हा एकदा दोघेही चर्चेत आले आहेत, आणि याला कारण आहे, दोघांच्या कारची नंबर प्लेट आहे. ( bollywood actress Katrina kaif vicky kaushal car number plate picture went viral on social media followers share photos of cars)

दोघांचेही सोबत फोटो आणि व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात. अलीकडेच सुप्रसिद्ध फोटोग्राफर ‘yogenshah_s’ ने इंस्टाग्रामवर कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या कारच्या नंबर प्लेटचा फोटो शेअर केला आहे. शेअर करत त्याने लिहिले, ‘कतरिनाच्या कारचा नंबर – 8822 आणि विकी कौशलच्या कारचा नंबर – 7722’. दोन्हीकडे रेंज रोव्हर कार आहेत आणि नंबर प्लेटमध्ये एक भारी साम्य आहे. दोघांच्याही कारचा क्रमांक 22 ने संपतो.

पाहा फोटो:

हा फोटो सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. यासोबतच लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. दोघांनाही खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे, सध्या सोशल मीडिया यूजर्स दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

विकी-कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यापासून लोक कमेंट्स करत आहेत आणि त्यातून ते प्रेमकथा सांगत आहेत. काही युजर्स म्हणतात की त्यांच्या कारचा नंबर एक प्रेमाचा पुरावा आहे. त्याच वेळी, काही लोक मजा देखील घेत आहेत.

हेही पाहा:

Video: वधूपेक्षा वराला मेकअपची जास्त क्रेझ, वराचा मेकअप पाहून वधू वैतागली, पाहा भन्नाट व्हिडीओ

Viral Video: आईला नववधुच्या पेहरावात पाहून चिमुरडी म्हणाली, आई तुझ्याइतकं कुणीच सुंदर दिसत नाही!