
मुंबई: शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायला जागा मिळते. आता तर टॅलेंट दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म्स पाच पट झालेत. आता कार्यक्रम तर आहेतच पण त्यासोबतच सोशल मीडिया सुद्धा आहे. सोशल मीडियावर रोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे, कधी गाण्याचे व्हिडीओ. या प्लॅटफॉर्म्समुळे लोक सुद्धा छान खुलायला लागलेत. म्हणजे जगभरातून इतक्या पद्धतींचे व्हिडीओ समोर येतात की लोक सुद्धा आता मनात असेल ते करून मोकळे होतात, लाजत नाहीत. मुलं सुद्धा मुलींसारखा डान्स करतात, कधी-कधी तर ते स्कर्ट, साडी नेसून वगैरे डान्स करतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक मुलगा त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात जबरदस्त डान्स करतोय.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा जबरदस्त डान्स करतोय. हा मुलगा दीपिका पदुकोण सारखा डान्स करतोय. या गाण्यावर दीपिकाची जी हुक स्टेप आहे तीच हा मुलगा करतोय आणि त्याला इतर मुलं जबरदस्त प्रतिसाद देतायत. तो जेव्हा डान्स करतोय तेव्हा या व्हिडीओ मध्ये मागून प्रेक्षकांचा आवाज सुद्धा येतोय. एखाद्या मुलीलाही असा डान्स जमणार नाही या प्रकारे हा मुलगा ठुमके लागावतोय.
@gauravsitoula_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केलाय. अनेक जणांनी यावर प्रतिक्रिया दिलीये. “हमारा छोरा, छोरियों से कम है क्या…” हा दंगल चित्रपटाला डायलॉग लोकांनी फिरवून वापरलाय. हा मुलगा पठाण चित्रपटातील Besharam Rang गाण्यावर नाचतोय. पठाण चित्रपटाची क्रेझ आजही लोकांमध्ये आहे. या गाण्यावर कित्येक रिल्स, व्हिडीओ आजही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतायत. शाहरुख आणि दीपिकाच्या याच गाण्यावर या मुलाने ठुमके लगावलेत. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघाल.