प्रपोज करायला गुडघ्यावर बसला, फजिती झाली…मुलगी बघतच राहिली!

आधी या गोष्टी कमी बघायला मिळायच्या. आता या सर्रास पाहायला मिळतात. प्रपोज करणं तर आता खूप सोपं आणि तितकंच महत्त्वाचं आहे आता.

प्रपोज करायला गुडघ्यावर बसला, फजिती झाली...मुलगी बघतच राहिली!
Proposal
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 30, 2022 | 10:44 AM

प्रेम व्यक्त करणं हे प्रेम करण्याइतकंच महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रेम कितीही करा पण ते जर व्यक्त करता येत नसेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. आजकाल पीडीए नावाची पण एक संकल्पना असते. ज्यात लोकांनाही दाखवलं जातं किती प्रेम आहे आमचं एकमेकांवर. आधी या गोष्टी कमी बघायला मिळायच्या. आता या सर्रास पाहायला मिळतात. प्रपोज करणं तर आता खूप सोपं आणि तितकंच महत्त्वाचं आहे आता. अंगठी देऊन प्रपोज केलं जातं, प्रेमाचा प्रस्ताव ठेवला जातो. असाच एक प्रपोजलचा व्हिडीओ वायरल होतोय ज्यात प्रपोज करणाऱ्या मुलाची चांगलीच फजिती झालीये.

विचार करा तुम्ही खूप विचार करून सगळं आत्मविश्वास एकवटून कुणालातरी प्रपोज करायला जाताय आणि तुमची फजिती होते. सगळा प्लॅन चौपट नाही का?

हा व्हिडीओ बघा हा मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी सगळं प्लॅन करतो. निसर्गरम्य ठिकाणी आपल्या मनातलं बोलून दाखविण्याचा त्याचा हा प्लॅन फसलेला दिसतोय.

अंगठी घालताना किंवा प्रपोज करताना गुडघ्यावर बसून प्रपोज केलं जातं. हा मुलगा गुडघ्यावर बसायला जातो. अंगठी द्यायला जातो आणि पुढे… व्हिडीओच बघा…!

व्हिडीओ

मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी एका झऱ्याच्या बाजूला नेलं. कदाचित त्याला हीच जागा बेस्ट वाटली असावी. तिथे तिला घेऊन जाताच तो गुडघ्यावर बसला आणि त्याने अंगठी पुढे केली.

अंगठी देताना त्याचा तोल गेला. अंगठी त्या झऱ्यात पडली. मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड दोघांनाही काही कळेना काय करायचं आता. त्या मुलाची चांगलीच फजिती झाली. मुलीलाही धक्का बसला.

हा व्हिडिओ 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट्स केल्या जात आहेत, असा हा व्हिडिओ फेल आर्मी नावाच्या अकाऊंटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.