“सपने मिलती है, ओ कुडी मेरी” सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काय आहे ते देखील पाहूया...

सपने मिलती है, ओ कुडी मेरी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!
Marriage
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 12, 2022 | 5:59 PM

भारतात लग्न असेल आणि त्यात डान्स नसेल तर असं कसं? नृत्य आणि गाणे नसलेले लग्न आपण क्वचितच पाहिले असेल. याच कारणामुळे लग्नातील डान्सशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वधू-वराच्या डान्सचे अनेक मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काय आहे ते देखील पाहूया…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, वधू-वर स्टेजवर बसले आहेत. अचानक मनोज बाजपेयी आणि उर्मिला मातोंडकर यांच्या ‘सपने में मिलती है, ओ कुडी मेरी सपने में मिलती है’ हे गाणं, सत्या चित्रपटातील… वाजू लागतं.

गाणं ऐकल्यानंतर दोघंही डान्स करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. त्यांचा हा डान्स पाहून सर्व पाहुणे स्तब्ध होऊन त्यांच्याकडे टक लावून पाहत राहतात. डान्स करताना दोघंही एक स्टेप करतात. त्या दोघांना पाहून वाटतं की, ते या क्षणाचा खूप आनंद घेत आहेत.

वर-वधूला असे नाचताना पाहून अनेक पाहुणे स्वत:ला रोखू शकत नाहीत आणि ते डान्स फ्लोअरवरही उड्या मारतात. त्यांना पाहून इतरांचाही उत्साह जागृत होतो आणि ते दणक्यात नाचू लागतात.

कॅमेऱ्याचा संपूर्ण फोकस या जोडप्यावर कायम राहतो. व्हिडिओ पाहून तुम्हीही तुमचे पाय थरथरण्यापासून रोखू शकणार नाही.