Trending: फुग्यांसोबत हवेत उडाली नवरी! फोटोशूट बेतला जीवावर, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Trending: लग्नाच्या आधी फोटोशूट करण्याची क्रेझ जवळपास सर्वच कपलमध्ये असते. अशाच एका फोटोशूट दरम्यान नवरीच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.

Trending: फुग्यांसोबत हवेत उडाली नवरी! फोटोशूट बेतला जीवावर, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
Bride
| Updated on: Oct 29, 2026 | 1:53 PM

Trending: लग्न म्हटलं की आनंद, उत्साह आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सुखी संसार संसार करायचा… अशीच प्रत्येक कपल इच्छा असते. अशात गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेझ जवळपास सर्वत कपलमध्ये पाहायला मिळत आहे. पण फोटोशूट करत असताना, अनेक अपघात अडल्याचं देखील आपल्या समोर आलं आहे. आता देखील असंच काही झालं आहे. फोटोशूट करण्यासाठी नवरीच्या हातात अनेक फुगे देण्यात येतात, पण नवरी फुग्यांसोबत उडू लागते… हा प्रसंग पाहिल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसतो… सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे आणि अनेकांना त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत,

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथील एका बीचवर घडल्याचं सांगितलं जात आहे, जिथे एक नवरी प्री-वेडिंग शूट करत होती. ‘एक्स’ हँडल @anbeanews वरून शेअर केलेल्या पोस्टनुसार, इस्तंबूलच्या सुंदर बास्फोरस (Bosphorus) किनाऱ्यावरील हे दृश्य पाहून तेथे उपस्थित लोकही अवाक् झाले. लग्नाच्या आठवणी कॅमेऱ्यात कायमच्या कैद करण्यासाठी नवरीने हातात खूप सारे मोठे हेलियमचे फुगे धरले होते. फोटोशूट पूर्ण मजेत आणि उत्साहात सुरू होते, पण निसर्गाचे काही वेगळंच मान्य होतं.

Loading...

येथे पाहा व्हिडीओ

 

 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की, फोटोशूट सुरु असताना अचानक समुद्र किनारी वाऱ्याचा वेग वाढला. फुग्यांचा आकार मोठा असल्यामुळे ते पॅराशुट प्रमाणे हवेत उडू लागले. वाऱ्याचा वेग इतका होता की, जमिनीवर नवरीचे पाय देखील लागत नव्हते… दरम्यान, फोटोग्राफर आणि आजू-बाजूला असलेल्या लोकांना कळलंच नाही की, नक्की काय होत आहे.

फुगे उडू लागल्यानंतर नवरी ओरडू आणि सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. अशात एक व्यक्ती पुढे आला आणि पळत नवरीच्या हातातले फुगे धरले… नाही मोठा अनर्थ घडला असता. या संपूर्ण प्रकरणात फोटोशूट देखील मध्येच थांबवावं लागलं. सोशल मीडियावर व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे आणि अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आयुष्या आनंद महत्त्वाचा आहे. पण हवं तसं आयुष्य जगण्यासाठी सुरक्षेची काळजी कायम घेतलीच पाहिजे…’, सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

(Disclaimer: हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवर आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रियांवर आधारित आहे. या पोस्टमध्ये केलेल्या दाव्यांची सत्यता ‘tv 9 मराठी’ (TV9 Marathi) स्वतंत्रपणे पडताळत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us