AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election Result 2026 : युतीला अर्थच काय? हसन मुश्रीफ यांचं थेट विधान; विधान परिषदेचा निकाल येताच महायुतीत स्फोट

विधान परिषद निकालानंतर महाराष्ट्रातील महायुतीत मोठा अंतर्गत स्फोट झाला आहे. शिंदे सेनेने युती धर्म पाळला नसल्याचा भाजपचा आरोप आहे, तर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी थेट 'युतीला अर्थच काय?' असा संतप्त सवाल विचारला आहे. अंतर्गत गटबाजीमुळे महायुतीला जागा गमवाव्या लागल्याचे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे सत्ताधारी पक्षातच तणाव वाढला आहे.

MLC Election Result 2026 : युतीला अर्थच काय? हसन मुश्रीफ यांचं थेट विधान; विधान परिषदेचा निकाल येताच महायुतीत स्फोट
hasan mushrifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 1:49 PM
Share

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा निकाल येताच महायुतीत मोठा स्फोट झाला आहे. सत्ताधारी पक्षातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपने तर शिंदे सेनेवर उघड उघड हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे सेनेने युती धर्म पाळला नाही. एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीच भाजपने केली आहे. भाजपने एकप्रकारे शिंदे सेनेवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. सेना-भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता राष्ट्रवादीनेही थेट शिंदे सेनेवर टीका केली आहे. असं होणार असेल तर युतीला अर्थच काय? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांनी सावध होणे गरजेचे आहे. आपण जर भांडत बसलो तर काय होते, याचे परिणाम दिसून आले आहेत. पुण्यामध्येही तसेच झाले. आपण आपापसातील भांडणे मिटवू शकलो असतो, तर स्मिता जाधव आमदार असत्या, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

दोन वर्ष काम नाही, आता हेच…

छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी उघडउघड विरोधात प्रचार केला. असे जर होत असेल, तर युतीला अर्थ काय राहिला? असा सवाल करतानाच मुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांना एकत्र बसवून मार्ग काढला पाहिजे आणि असे धोके टाळले पाहिजेत. तरच युती एकसंघ राहील. आता तीन वर्षे काही निवडणुका नाहीत आणि हेच काम आता करावे लागेल, असं मुश्रीफ यांनी म्हटलंय.

अर्थ खातं मिळेल

यावेळी त्यांनी अर्थ खात्यावरही भाष्य केलं. अर्थ खातं तुमचे आहे. आम्ही लवकरच हे खाते तुम्हाला देऊ आणि मंत्रिपदाच्याही जागा भरल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आम्हाला अर्थ खातं मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीत काय घडलं?

विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला दोन जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील अंतर्गत संघर्ष, गटबाजी आणि नाराजी यामुळे महायुतीला तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत. महायुतीतील पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात प्रचार केल्याने त्याचा फटका तिन्ही पक्षांना बसला आहे. खासकरून शिंदे सेनेमुळे भाजपला आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असून शिंदे सेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या रडारवर आली आहे.

Follow Us
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार