लग्न होऊन नवरी घरी आली, नवरदेवाला फसवणूक झाल्याचं कळलं! विष घेतो म्हणून धमकी

प्रथेनुसार वधू-वरांनी सात फेरे घेतले. निरोप घेतल्यानंतर वधू वराच्या गावी आली. यानंतर नव्या सुनेचा चेहरा दाखवण्याचा विधी सुरू झाला.

लग्न होऊन नवरी घरी आली, नवरदेवाला फसवणूक झाल्याचं कळलं! विष घेतो म्हणून धमकी
indian bride in ghungat
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 05, 2023 | 4:41 PM

तुम्ही लग्नादरम्यान अनेक भांडणे पाहिली असतील. मात्र उत्तर प्रदेशातील संभलमध्ये वराची बाजूची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. वधू पक्षाने लहान मुली ऐवजी मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मोठ्या मुलीशी लग्न लावल्याचा आरोप वराच्या बाजूने केला आहे. सासरच्या घरी तोंड दाखविण्याच्या सोहळ्यात जेव्हा नवरीने पदर उचलला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. यानंतर एकच खळबळ उडाली. मुलानी संतापून वधूला तिच्या घरी परत पाठवले. आता न्याय न मिळाल्यास आत्महत्येसारखे पाऊलही उचलू शकतो, अशी धमकी वराने दिली आहे.

ही घटना हजरत नगर गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटौली गावातील आहे. इथे 26 जानेवारी रोजी कैलादेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीसोबत दालचंद नावाच्या तरुणाचा विवाह झाला होता.

धार्मिक विधींमुळे तिच्या डोक्यावर पदर होता चेहरा झाकला गेलेला होता. प्रथेनुसार वधू-वरांनी सात फेरे घेतले. निरोप घेतल्यानंतर वधू वराच्या गावी कटौलीला आली.

यानंतर नव्या सुनेचा चेहरा दाखवण्याचा विधी सुरू झाला. वराच्या बाजूच्या महिलांनी वधूचा पदर उचलताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

वराच्या बाजूने आरोप केला आहे की पदर उचलताच वधूच्या बाजूने लहान मुलीऐवजी मोठ्या मुलीचे लग्न लावले हे समजून चुकलं. ही गोष्ट संपूर्ण गावात वणव्यासारखी पसरली. यानंतर वादावादी आणि पंचायत बसली.

वधू पक्षाने वर पक्षाकडून हुंड्याची मागणी करण्यात आल्याचे वधू सांगितले. मोठ्या मुलीची मानसिक स्थिती कमकुवत असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. पंचायती होऊनही आजतागायत यावर तोडगा निघालेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे वर दलचंद याने म्हटले आहे.

ज्या मुलीशी माझे लग्न झाले ती मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. मी ते माझ्याजवळ ठेवणार नाही. एकतर मी विष खाईन किंवा फाशी देऊन मरेन असं ते म्हणतायत. हा सगळा प्रकार आता चर्चेचा विषय ठरतोय.