Video | लग्न सोप्पं नसतं ! नवरी होण्यासाठी काय कष्ट घेतले ? तरुणीने कथा सांगताच व्हिडीओ व्हायरल

सध्या अशाच एका सुंदर नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वत:चे लग्न असल्यास किती कष्ट घ्यावे लागतात हे नवरीने सांगितले आहे.

Video | लग्न सोप्पं नसतं ! नवरी होण्यासाठी काय कष्ट घेतले ? तरुणीने कथा सांगताच व्हिडीओ व्हायरल
bride viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. लग्न समारंभातील व्हिडीओ तर नेटकरी आवडीने पाहतात. नवरी-नवरदेवाशी संबंधित व्हिडीओ पाहणे नेटकऱ्यांना आवडते. सध्या अशाच एका सुंदर नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वत:चे लग्न असल्यास किती कष्ट घ्यावे लागतात हे नवरीने सांगितले आहे. (bride saying struggle of weight loss and diet for video viral)

मेकअप करताना सांगतेय नवरी तिची कथा

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये नवरी लग्नसमारंभात जाण्याआधी मेकअप करताना दिसते आहे. यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. यावेळी मेकअप करताना ती समोर उभ्या असलेल्या व्यक्तीशी बोलते आहे. स्वत:चे लग्न असल्यावर काय काय करावे लागते ? किती कष्ट घ्यावे लागतात ? हे व्हिडीओतील नवरी सांगत आहे.

तब्बल पाच किलो वजन कमी केलं, सकाळपासून जेवलेही नाही : नवरी

सध्या व्हायरल होत असलेली नवरी लग्नामध्ये गोड आणि सुंदर दिसण्यासाठी काय कष्ट घेतले हे सांगत आहे. तिने ड्रेस व्यवस्थित दिसावा म्हणून पाच किलो वजन कमी केले आहे. तसेच सकाळपासून जेवण केलं नसल्याचेही ती सांगते आहे. विशेष म्हणजे लग्नाचा सोहळा संपल्यानंतर मला आधी जेवण द्या, असे मी सांगणार असल्याचेही व्हिडीओतील नवरी सांगत आहे. ही नवरी अतिशय मजेदार पद्धतीने तिची होत असलेली उपासमार या व्हिडीओमध्ये सांगते आहे.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला Witty Wedding या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ मोठ्या मजेत पाहत आहेत.

इतर बातम्या :

Video | ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत लिप लॉक, किसिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल

Video : नाचता-नाचता खाली पडली पॅंट, पुढे जे झाले ते पाहून व्हाल लोट-पोट

Video | नारी शक्ती जिंदाबाद ! एकाच वेळी करतेय दोन कामे, व्हिडीओ व्हायरल

(bride saying struggle of weight loss and diet for video viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI