Video | नारी शक्ती जिंदाबाद ! एकाच वेळी करतेय दोन कामे, व्हिडीओ व्हायरल

सध्या असाच एक जबरदस्त व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी महिलेने केलेल्या जुगाडाची प्रशंसा केली आहे.

Video | नारी शक्ती जिंदाबाद ! एकाच वेळी करतेय दोन कामे, व्हिडीओ व्हायरल
viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही मोजकेच व्हिडीओ असे असतात ज्यांची दिवसभर चर्चा होते. सध्या असाच एक जबरदस्त व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी महिलेने केलेल्या जुगाडाची प्रशंसा केली आहे. (women doing office work and cooking in kitchen at one time video went viral on social media)

वर्क फ्रॉम होममुळे महिलांच्या डोक्याला ताप

सध्याच्या कोरोनाकाळात जवळपास सगळेच लोक घरुन काम करत आहेत. घरी असल्यामुळे महिला तसेच पुरुषांना एकाच वेळी वेगवेगळी कामे करावी लागत आहेत. यातही महिलांच्या तर डोक्याला तापच झाला आहे. मुलांची देखभाल, स्वयंपाक ते ऑफिसचे काम असे सगळे काम महिलांना एकाच वेळी करावे लागत आहे. याच कारणामुळे काही महिला वैतागल्यासुद्धा आहेत. मात्र, काही महिला अशासुद्धा आहेत, ज्या ही सर्व कामे अत्यंत स्मार्टपणे करत असून त्यासाठी त्या वेगवेगळे जुगाड वापरत आहेत.

लॅपटॉपवर काम करताना महिला ड्रिल मशीन घेऊन बसली

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अगदीच विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला लॅपटॉपवर काम करताना दिसते आहे. सोबतच तिच्या हातामध्ये एक ड्रिल मशीनसुद्धा आहे. लॅपटॉपवर काम करत असताना ही महिला दुसऱ्या हातात ड्रिल मशीन का घेऊन बसली असावी, असा प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. मात्र, हातात ड्रिल घेऊन बसण्याचे कारण व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

एकाच वेळी महिलेकडून दोन काम

ही महिला वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे ती एकाच वेळी दोन कामे करत आहे. एका हाताने ऑफिसचे काम तर दुसऱ्या हाताने ही महिला किचनमध्ये काहीतरी तळते आहे. त्यासाठी या महिलेने ड्रिल मशीनचा उपयोग केला आहे. तिने ड्रिल मशीनला एक लांब दोरी बांधली आहे. ही दोरी संपूर्ण घरात फिरवून नंतर ती एका चम्मचला बांधण्यात आली आहे. ज्या चम्मचला ही दोरी बांधण्यात आली आहे, तो चम्मच बरोबर पातेल्यामधील पदार्थ हालवतो आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या महिलेच्या डोक्यालिटीकडे पाहून सगळेच आश्चर्यकचिकत झाले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | भुकेलेल्या सिंहाची हत्तीच्या पिल्लावर झडप, शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

Video : टायरमध्ये बसून चिमुकला गोल-गोल फिरला, जबरदस्त Ride पाहून नेटिझन्स अवाक

Video | मदत करायला गेला अन् अडकून बसला, आजीच्या आयडियाचे सगळीकडून कौतूक

(women doing office work and cooking in kitchen at one time video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI