Video | भुकेलेल्या सिंहाची हत्तीच्या पिल्लावर झडप, शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 26, 2021 | 4:02 PM

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा एका शिकारीचाच आहे. मात्र, यावेळी सिंहाने केलेली ही शिकार साधी नसून त्याने चक्क एका हत्तीच्या पिल्लाला आपल्या जबड्यात पकडलं आहे.

Video | भुकेलेल्या सिंहाची हत्तीच्या पिल्लावर झडप, शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच
lion elephant viral video

मुंबई : सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या संख्येने अपलोड केले जातात. यातील बरेच व्हिडीओ हे शिकार तसेच प्राण्यांच्या एकमेकांवरील हल्ल्याचे असतात. याच कारणामुळे सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या चवीने पाहिले जातात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा एका शिकारीचाच आहे. मात्र, यावेळी सिंहाने केलेली ही शिकार साधी नसून त्याने चक्क एका हत्तीच्या पिल्लाला आपल्या जबड्यात पकडलं आहे. (lion attacking on elephant video went viral on social media)

सिंह करतोय हत्तीच्या पिल्लाची शिकार

या व्हिडीओमध्ये जंगलाचा राजा सिंह एका हत्तीच्या पिल्लाची शिकार करताना दिसतोय. ज्या हत्तीच्या पिल्लाची शिकार होत आहे, ते जरी पिल्लू वाटत असले तरी ते सिंहापेक्षा चांगलेच मोठे आहे. मात्र, आपल्यापेक्षा मोठे असले तरी या व्हिडीओतील सिंहाने हत्तीच्या पिल्लाची शिकारी केली आहे. सिंहाने हत्तीची केलेली शिकार कॅमऱ्यात कैद करण्यात आली आहे.

ताकदीच्या जोरावर हत्तीच्या पिल्लाला जमिनीवर पाडलं

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक सिंह आणि सिंहीण दिसत आहेत. या दोघांनी मिळून हत्तीच्या पिल्लावर तेट हल्ला केला आहे. सुरुवातीला सिंहाने हत्तीच्या पिल्लावर मागच्या बाजूने हल्ला केला आहे. तसेच आपल्या शक्तीच्या जोरावर त्याने हत्तीच्या पिल्ला खाली जमिनीवर पाडले आहे. हत्ती खाली पडल्यानंतर त्याची शिकार करायला सिंहासोबत सिंहीणसुद्धा आली आहे. त्यानंतर क्षणार्धात हत्तीचे पिल्लू शांत होताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून लाईक केले आहे. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा केले आहे. काही नेटकऱ्यांनी सिंहाच्या हिमतीची प्रशंसा केली आहे. तर काहींना सिंहाने केलेल्या शिकारीनंतर दुख:सुद्धा व्यक्त केलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video : टायरमध्ये बसून चिमुकला गोल-गोल फिरला, जबरदस्त Ride पाहून नेटिझन्स अवाक

Video | मदत करायला गेला अन् अडकून बसला, आजीच्या आयडियाचे सगळीकडून कौतूक

Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओVideo | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ

(lion attacking on elephant video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI