Video | ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत लिप लॉक, किसिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल

या व्हिडीओमध्ये ब्रिटनचे आरोग्यमंत्री आपल्या महिला सहकाऱ्याला किस करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यांनी केलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Video | ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत लिप लॉक, किसिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल
MATT HANCOCK VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेते, नट्या तसेच मोठ्या राजकीय व्यक्तींचे खासगी तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ यापूर्वी अनेकवेळा व्हायरल झालेले आहेत. मोठ्या लोकांचे खासगी व्हिडीओ इंटरनेटवर आल्यामुळे वेळोवेळी खमंग चर्चासुद्धा रंगलेल्या आपण पाहिल्या आहेत. मात्र, यावेळी एका मंत्र्याचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे समाजमाध्यमांवर धुमाकूळ माजला आहे. या व्हिडीओमध्ये ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक (Matt Hancock) आपल्या महिला सहकाऱ्याला किस करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यांनी केलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. (Britain health secretary Matt Hancock kissing video went viral on social media)

आरोग्य विभागाच्या मुख्यालयाबाहेर महिला घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक (Matt Hancock) हे आपल्या एका महिला सहकाऱ्याला किस करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा 6 मे रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना लंडनमधील आरोग्य विभागाच्या मुख्यालयाबाहेरील आहे. व्हिडीओमध्ये मॅट हॅनकॉक (Matt Hancock) त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एका महिला सहकाऱ्याला किस करताना दिसत आहेत.

मॅट हॅनकॉक यांच्यावर टीकेची झोड

हा प्रकार समोर आल्यानंतर ब्रिटन तसेच जगभरातून मॅट हॅनकॉक यांच्यावर टीका होत आहे. लोक त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. मात्र, लोकांच्या या मागणीला धुडकावत त्यानी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तसेच घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण देताना “कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, त्यामुळे माफी मागतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

किस कोणाला करावे ही ज्याची त्याची खसगी बाब

काही नेटकरी मॅट हॅनकॉक यांच्यावर टीका करत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी दुसरीकडे त्यांची पाठराखण करण्यासाठीही काही लोक समोर आले आहेत. एखाद्या व्यक्तीने कोणाला किस करावे आणि कोणाला नाही, ही ज्याची-त्याची खासगी बाब आहे, असे म्हटले आहे. तसेच मॅट हॅनकॉक यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचेही काही लोक म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

दरम्यान, यापूर्वीही जगभारातील अनेक सेलिब्रिटींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. मात्र, सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यात एका मोठ्या मंत्र्याचा असा लिपलॉकचा व्हिडीओ समोर आल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

Video: ब्रेकिंग न्यूज सांगताना पत्रकार थांबला, लाईव्ह टीव्हीवर म्हणाला ‘पगार मिळत नाहीये, आम्हीही माणसंच’

Video | भुकेलेल्या सिंहाची हत्तीच्या पिल्लावर झडप, शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ

(Britain health secretary Matt Hancock kissing video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI