VIDEO : रेल्वेच्या फाटका खालून काढली गाडी, नेटकरी म्हणाले…

अती घाई संकटात नेई, असं वाक्य आपण अनेकदा रस्त्याला वाचलं असेल, परंतु तरी सुध्दा अनेकांना घाई असते. त्यामुळे अनेकदा अनेकांच्यावरती संकट आलं आहे.

VIDEO : रेल्वेच्या फाटका खालून काढली गाडी, नेटकरी म्हणाले...
car cross railway gate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2023 | 4:45 PM

मुंबई : नेहमी असं म्हटलं जातं की, घाई पेक्षा उशिर बरा, परंतु ही गोष्ट काही लोकांना पटकन (trending video) नाही असं वाटतंय. याची काही उदाहरणं तुम्हाला सोशल मीडियावर (social media) पाहायला मिळत आहेत. अनेकदा गडबडीत निघून जाण्यासाठी जी लोकं प्रयत्न करतात, त्यांचा अपघात झाला आहे. त्याचबरोबर काही लोकांचा अपघातामध्ये मृत्यू देखील झाला आहे. काही लोकांना गर्दी दिसली की, घाई करुन चुकीचा रस्ता शोधत असतात आणि अडचणी निर्माण करतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या (viral video) विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल.

हा व्हायरल व्हिडीओ आहे, त्यामध्ये एका गाडी चालक रेल्वे रुळ ओलांडत आहे. रेल्वेचे फाटक बंद असताना सुध्दा तिथून एक चालक गाडी काढण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ १६ डिसेंबरचा आहे. हा व्हिडीओ कुठल्या ठिकाणचा हे अद्याप समजलेलं नाही. पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, कार चालक रेल्वे ट्रॅक ओलांडतो. त्यानंतर काहीवेळात तिथून ट्रेन गेली आहे. पाठीमागे ट्रेन जात आहे. त्यावेळी तो गाडी चालक तिथून जाण्यासाठी गाडी पुढे-पाठी करीत आहे. तीनवेळा चालकाने गाडी पुढे पाठी केल्यानंतर गाडी तिथून निघून गेली आहे. त्यावेळी तिथं असलेल्या वॅचमेनने त्या गाडीचा फोटो काढला आहे.

हा व्हिडीओ X प्लेटफॉर्मवरती octorAjayita नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या व्हिडीओला अनेक कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहीलं आहे, हा पक्का नवा चालक असेल. दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहीलं आहे, हा व्यक्ती नक्की आपल्या दाजीची गाडी घेऊन आला असेल. इतक्या घाईत असलेली व्यक्ती पानाच्या दुकानावर नक्की थांबेल.