जंगलात अशी लपूनछपून फोटो काढत होती महिला, बाजूला येऊन बसला चित्ता, मग जे घडलं…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ जंगलातील आगीसारखा पसरला आहे. यामध्ये एक महिला छायाचित्रकार जंगल सफारी जीपजवळ बसून प्राण्यांचे फोटो काढत होती, तेव्हा अचानक एक चित्ता तिच्या बाजूला येऊन बसला. मग जे घडलं, ते तुम्हीही पाहा...

जंगलात अशी लपूनछपून फोटो काढत होती महिला, बाजूला येऊन बसला चित्ता, मग जे घडलं...
Viral Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 18, 2025 | 12:39 PM

आजकाल सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात. कधी प्राण्यांमध्ये होणारी भांडणे तर कधी प्राणांचे माणसांसोबतचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एक महिला वन्यजीव छायाचित्रकार (Wildlife Photographer) जंगल सफारीदरम्यान जीपजवळ जमिनीवर बसून मोठ्या आनंदाने चित्त्याचे फोटो काढत होती. तेवढ्यात मागून एक चित्ता हळूच येऊन तिच्या बाजूला बसला. होय, अगदी बाजूला, तोही अगदी शांतपणे बसला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चित्ता अगदी महिलेच्या बाजूला बसलेला दिसत आहे, पण तो कोणालाही इजा करत नाही, फक्त आपल्या इतर चित्त्या मित्रांकडे पाहत आहे. जणू तो कॅमेऱ्यासमोर आपल्या कळपाची वाट पाहत आहे.

वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…

हा दुर्मिळ व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे सांगितले जात आहे, जो कोणीतरी 16 ऑक्टोबरला X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला. आता हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओला एकाच दिवसात 1 कोटी 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसेच अडीच लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

चित्त्याने दिला ‘धप्पा’

@buitengebieden या X हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, अरे मित्रांनो, कोणाकडे पाहताय? या व्हिडीओवर लोक जोरदार कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली, जणू चित्ता म्हणत आहे, शांत व्हा मित्रांनो, मी फोटोशूटसाठी आलोय. दुसऱ्याने म्हटलं, चित्त्याने खरंच धप्पा दिला. आणखी एका युजरने लिहिलं, मी तर हे विचार करून थक्क झालो की तेव्हा त्या महिलेच्या मनात काय चाललं असेल.