VIDEO | लग्नात पाहुणी म्हणून आली, कोणालाही संशय नाही, रोख दागिने घेऊन फरार, पाहा व्हिडीओत महिलेची चलाखी

VIDEO | लग्नात आली, नातेवाईकांशी गप्पा हाणल्या, कोणालाही संशय नाही, पसार झाल्यानंतर अख्खं वऱ्हाड टेन्शनमध्ये...

VIDEO | लग्नात पाहुणी म्हणून आली, कोणालाही संशय नाही, रोख दागिने घेऊन फरार, पाहा व्हिडीओत महिलेची चलाखी
VIDEO | लग्नात आली, नातेवाईकांशी गप्पा हाणल्या, कोणालाही संशय नाही, पसार झाल्यानंतर अख्खं वऱ्हाड टेन्शनमध्ये...
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 11, 2023 | 12:28 PM

छत्तीसगड : राज्यातील बिलासपूर (Bilaspur) जिल्ह्यात एक भयानक घटना उघडकीस आली आहे. लग्नात पाहूणी म्हणून गेलेली महिला रोकड आणि सोने घेऊन फरार झाली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. लग्नात कुणाला कसल्याही प्रकारची शंका आली नाही. मात्र वस्तू गायब झाल्यानंतर अख्खं वऱ्हाड टेन्शनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

सिरगिट्टी थाना या पोलिस स्टेशनमध्ये महिला आणि तीन पुरुषांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. महिलेने लाखो रुपयांचे दागिने आणि कॅश चोरी केल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.

कश्यप कॉलनीत आकाश मलानी यांच्या छोट्या भावाची आशीष मलानी याचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी झूलेलाल मंगलम शादी भवनमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यातं आलं होतं. त्यावेळी तिथल्या खुर्चीत पैसे आणि सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यावेळी लग्नात आलेली तरुणी आणि तीन पुरुषांच्या मदतीने सोने घेऊन फरार झाली.

पोलिसांनी सीसीटिव्ही तपासून सगळी घटना पाहिली आहे. त्याचबरोबर आरोपीचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे. लग्नाच्या समारंभात सगळे व्यस्त असल्यामुळे कुणाचंही ध्यान चोरट्यांच्यावरती गेलं नाही. त्यामुळं आता वऱ्हाड टेन्शनमध्ये आलं आहे.