
मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. मृत्यू कधी कधी आपल्याला हुलकावणी सुद्धा देतो हे जगभरातील अनेक उदाहरणावरून आपल्याला माहिती आहे. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. या चमत्काराने जगात कोणतीतरी अदृश्य शक्ती काम करते असे दावा लोक करत आहेत. चीनमधील ही चमत्कारीक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण एक महिला 12 व्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडून सुद्धा वाचली आहे. तिचा पती तर जबरदस्त धक्क्यात आहे. कारण आता आपलं काय होईल या विचारात असतानाच बायकोने त्याला तात्काळ मदत बोलावण्यास सांगितले. बायकोच्या धीटाईचा सुद्धा त्याला आता कोण गर्व वाटत आहे.
जियांग्शी भागातील घटना
चीनमधील जियांग्शी हा प्रांत आहे. या भागात लेपिंग येथे ही महिला राहते. ती 44 वर्षांची आहे. ती आणि पती एकाच कंपनीत काम करतात. पेंग हुईफिंग असे तिचे नाव आहे. ती 12 व्या मजल्यावरून अचानक खाली कोसळली. पण ती चमत्कारीकरित्या वाचली. त्याची चर्चा सध्या संपूर्ण चीनमध्ये सुरू आहे. अनेकांचा यावर विश्वास बसत नाही. इतक्या उंचीवरून ही महिला जमिनीवर पडली. पण ती जिवंत होती. अनेकांनी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. तिची किंकाळी ऐकून अनेकांची आकाशाकडे नजर गेली. ती पडताना अनेकांना पाहिली. पण ती जिवंत असेल असे कुणाला ही वाटले नाही.
मी मेले नाही, जिंवत आहे, 120 वर कॉल करा
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या दैनिकाला पेंग हिने मुलाखत दिली आहे. तिची तब्येत आता चांगली आहे. मृत्यूच्या जबड्यातून परत आल्याचा तो दिवस तिला चांगलाच आठवतो. तिने ती घटना सांगितली. 12 व्या मजल्यावर ती आणि पती काम करत होते. बाल्कनी फिट करण्याचे काम सुरू होते. तसेच त्या घरातील उर्वरीत काम सुरू होते. ती घरातील काम आवरत होती. तर पती सुरक्षेची काळजी घेत बाल्कनीत काम करत होता. त्यांना घर मालकाला ते काम पूर्ण करून द्यायचे होते.
पण काय झाले हे तिच्या लक्षात येण्यापूर्वीच तिचा पाय सटकला आणि ती घसरत 12 व्या मजल्यावरील बाल्कनीतून थेट जमिनीवर आदळली. त्या काळात आता आपण वाचणार नाही हा विचार आपल्या मनात आल्याची ती म्हणाली. पण इतक्या उंचवरून पडून सुद्धा आपण जिवंत असल्याचे तिला जाणवले. तोपर्यंत तिचा पती तिच्याजवळ आला होता. तेव्हा आपण त्याला 120 या आपत्कालीन सेवेला संपर्क करण्यास सांगितल्याची आठवण तिने सांगितली. तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तिचा डावा, उजवा पाय, कंबर यांना जबरदस्त फटका बसला. त्यावर सध्या सर्जरी करण्यात आली नाही. पण येत्या काही महिन्यात आपण दोन्ही पायावर धडधाकट चालू असा विश्वास तिने व्यक्त केला. तेव्हा तिचा नवरा तिच्याकडे कौतुकाने पाहत होता.