फॅब इंडियाच्या ‘जश्न-ए-रिवाज’वरून वाद, #BoycottFabIndia चा आवाज

बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनीसुद्धा या मुद्द्याला हात घातलाय. तेजस्वीने ट्विट करून लिहिले, 'दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही. त्याला विरोध केला पाहिजे आणि फॅब इंडियावर बहिष्कार घातला पाहिजे. फॅब इंडियासारख्या कोणत्याही ब्रँडला अशा कृत्यासाठी आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

फॅब इंडियाच्या जश्न-ए-रिवाजवरून वाद, #BoycottFabIndia चा आवाज
fab india
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 8:52 PM

नवी दिल्लीः फॅब इंडिया कंपनीच्या ‘जश्न-ए-रिवाज’ मोहिमेमुळे खळबळ उडालीय. #BoycottFabIndia सकाळपासून सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. हा वाद फॅब इंडिया या कपडे, घर सजावट आणि जीवनशैली उत्पादनांशी संबंधित कंपनीचा आहे – ‘आम्ही प्रेम आणि प्रकाशाच्या सणाचे स्वागत करतो. फॅब इंडिया जश्न-ए-रिवाज कलेक्शन सादर करत आहे. त्यावरूनच आता वाद सुरू झालाय. राजकारण्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाज’ म्हटल्यानं नेटकऱ्यांनी त्यावर हरकत घेतलीय. ट्विटरवर फॅब इंडियावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे.

तेजस्वीकडूनही बहिष्काराची मागणी

बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनीसुद्धा या मुद्द्याला हात घातलाय. तेजस्वीने ट्विट करून लिहिले, ‘दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही. त्याला विरोध केला पाहिजे आणि फॅब इंडियावर बहिष्कार घातला पाहिजे. फॅब इंडियासारख्या कोणत्याही ब्रँडला अशा कृत्यासाठी आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

‘धार्मिक सण संपवण्याचा घाट’

पद्मश्री आणि मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष मोहनदास पै यांनीही फॅब इंडियाच्या ‘जश्न-ए-रिवाज’ मोहिमेवर आक्षेप घेतला. त्यांनी ट्विटरवर लिहिले, ‘फॅब इंडियाचे दिवाळीनिमित्त अत्यंत लज्जास्पद विधान आहे! हा ख्रिसमस आणि ईद सारखाच हिंदूंचा धार्मिक सण आहे! असे विधान धार्मिक सण संपवण्यासाठी मुद्दाम केलेला प्रयत्न दर्शवते! ‘


संबंधित बातम्या

Video: गर्भवती महिला ट्रेनरवर अस्वलाचा हल्ला, जमिनीवर पाडून नखांचे ओरखडे, हादरवून सोडणारा व्हिडीओ

शरीर माशाचं आणि तोंड मगरीचं, लाकडाच्या तुकड्याचा क्षणांत भूगा, झारखंडमध्ये सापडलेल्या माशाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा