शरीर माशाचं आणि तोंड मगरीचं, लाकडाच्या तुकड्याचा क्षणांत भूगा, झारखंडमध्ये सापडलेल्या माशाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

मच्छीमारांनी जाळं ओढून बाहेर काढलं. पण जाळ्यात असलेला मासा पाहून प्रत्येकाचे डोळे विस्फारले. कारण याचं रुप. याचं तोंड मगरीचं होतं, आणि शरीर माशाचं.

शरीर माशाचं आणि तोंड मगरीचं, लाकडाच्या तुकड्याचा क्षणांत भूगा, झारखंडमध्ये सापडलेल्या माशाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
झारखंडमध्ये सापडला अनोखा मगर मासा

झारखंडच्या धनबादमध्ये मासेमारी करताना मच्छीमारांनी असा मासे पकडला, ज्यांचे शरीर आणि तोंड मगरीसारखे आहे. जेव्हा गावकऱ्यांनी त्याच्या तोंडात लाकडाचा तुकडा टाकला, तेव्हा एका झटक्यात मगरीसारखे तोंड असलेल्या माशाने त्याचा चुरा केला. ही माशाची प्रजाती अद्याप कुठेही सापडलेली नाही. या माशाला काय म्हणतात, हेही या मच्छिमारांना माहित नाही. मात्र, माशाचं हे रौद्ररुप पाहून लोक घाबरले आहेत. (The mouth of a crocodile and the trunk of a fish. Unique crocodile fish found in Jharkhand)

 

लाकडाच्या तुकड्याचा या माशाने भूगा केला

असं सांगितले जाते की, रविवारी सकाळी गावातील लोक मासेमारी करत होते. यासाठी मच्छीमारांनी जाळं टाकलं होतं. गावकऱ्यांच्या मते, जाळ्यात एक मोठा मासा आला. जेव्हा जाळं जोरजोरात हलायला लागलं, तेव्हा मच्छीमारांनी जाळं ओढून बाहेर काढलं. पण जाळ्यात असलेला मासा पाहून प्रत्येकाचे डोळे विस्फारले. कारण याचं रुप. याचं तोंड मगरीचं होतं, आणि शरीर माशाचं.

स्थानिक मच्छिमारांनी याला पकडलं

हा मासा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे

मगर मासा पकडणारे स्थानिक मच्छिमार

लोक मगरीच्या तोंडासारखा मासा पाहण्यासाठी जमा झाले. त्यावेळी याच्या तोंडात लोकांना लाकडाचा तुकडा दिला, तर हा लाकडाचा या माशाने क्षणांत भूगा केला. त्यामुळेच लोकांनी त्याला मगर मासे असे नाव दिलं आहे. हा मासा पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोक येऊ लागले. सध्या मासा फक्त मच्छिमारांकडेच आहेत.जे लोक मासे मारतात ते म्हणतात की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात यापूर्वी कधीही असे मासे पाहिले नाहीत. सध्या माशांविषयी अनेक चर्चा आहेत.

हेही वाचा:

Video: 3 तोंडांच्या सापाचा फोटो पाहून नेटकरी घाबरले, पण खरं समजल्यावर विश्वास ठेवणं अवघड, पाहा निसर्गाचा अद्भूत चमत्कार

Video: गळात किंग कोब्रा घेऊन सर्पमित्राचे स्टंट, लोक म्हणाले, बाबा जपून, सापाचा काही भरवसा नसतो!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI