Family Dance Viral Video: अरे “बाबा” ने क्या एंट्री मारा! व्हिडीओ व्हायरल, स्टाईल असावी तर अशी

घरातली मुलं एका गाण्यांच्या तालावर नाचत असतात आणि मग पप्पांची एंट्री होते. पण ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने नृत्यात (Dance) प्रवेश केला आहे, ते तुम्हाला खूप भारी वाटेल, अहा काय स्टाईल आहे काकांची!

Family Dance Viral Video: अरे बाबा ने क्या एंट्री मारा! व्हिडीओ व्हायरल, स्टाईल असावी तर अशी
Viral Video Dance
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 19, 2022 | 4:04 PM

आपल्या सगळ्यांचेच वडील थोडे कडक असतात. हेच कारण आहे की बहुतेक मुले आपल्या वडिलांसमोर मजा करण्यास संकोच करतात आणि घाबरतात. पण जेव्हा पप्पाही त्याच स्टाइलमध्ये (Style) मुलांच्या मस्तीत सामील होतात तेव्हा काय होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप धुमाकूळ घालतोय, त्यात घरातली मुलं एका गाण्यांच्या तालावर नाचत असतात आणि मग पप्पांची एंट्री होते. पण ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने नृत्यात (Dance) प्रवेश केला आहे, ते तुम्हाला खूप भारी वाटेल, अहा काय स्टाईल आहे काकांची!

स्वॅग

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातील लहान मुलं गाण्यांच्या तालावर दणक्यात नाचताना दिसत आहेत. याचवेळी मागच्या सोफ्यावर बसलेली त्या मुलीची आई हे सगळं बघत बघत एन्जॉय करत असते. मग मुलीचे वडील आत येतात. पण वडील ज्या पद्धतीने प्रवेश करतात, ते तुम्हाला खूप मस्त वाटेल. यानंतर वडीलही मोठ्या स्वॅगमध्ये नाचू लागतात.

व्हिडीओ पाहा

स्मूथ एण्ट्री!

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आतापर्यंतचे सर्वात मस्त कुटुंब पाहिले आहे.’ ही संख्या सतत वाढत आहे. त्याचबरोबर लोक या व्हिडिओवर सतत मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने कमेंट केली की, “मध्यमवर्गीय कुटुंबाचे वडील 30 टक्के अप्रैजल मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत आहेत. त्याचवेळी आणखी एका युझरने कमेंट केली की, “अंकलजींनी स्मूथ एण्ट्री घेतली आहे. आणखी एका युझरने कमेंट केली की, “अंकल जास्त मस्त दिसत आहेत.”