Corona पुन्हा आला! लोकांनी इंटरनेटवर केलं कोरोनाचं स्वागत, ट्विटरवर मिम्स चा धुमाकूळ

अशा प्रकारे कोरोना व्हायरसने कहर सुरूच ठेवला तर येत्या 90 दिवसांत चीनची 60 टक्के लोकसंख्या कोरोनाला बळी पडेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Corona पुन्हा आला! लोकांनी इंटरनेटवर केलं कोरोनाचं स्वागत, ट्विटरवर मिम्स चा धुमाकूळ
Corona memes
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 21, 2022 | 4:53 PM

चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. गेल्या आठवड्यात कोविडमुळे इतके मृत्यू झाले आहेत की, मृतदेह ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजही उपलब्ध नाहीत. रिपोर्ट्सनुसार, स्मशानमध्ये सहा दिवसांची वेटिंग सुरू आहे. अशा प्रकारे कोरोना व्हायरसने कहर सुरूच ठेवला तर येत्या 90 दिवसांत चीनची 60 टक्के लोकसंख्या कोरोनाला बळी पडेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चीनप्रमाणेच जगातील अनेक देशांमध्येही कोविडचा उद्रेक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत भारतातील लोकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या दहशतीत मिम्स ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ट्विटरवर हॅशटॅग #COVID आणि #coronavirus ट्रेंड होत आहेत. या हॅशटॅगच्या माध्यमातून सतत मजेशीर मिम्स आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

एका युझरने ड्रम वाजवतानाचा काही लोकांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “वेलकम बॅक कोरोना.” आणखी एका युझरने साऊथ फिल्मचा सीन शेअर करत लिहिले, “येस बॉस… ते आले आहेत.”

मात्र, काही युझर्सनी याबाबत चिंताही व्यक्त केली आहे. यासोबतच लोकांना सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सध्या आपण निवडक मीम्स आणि व्हिडिओजवर नजर टाकूया…