रुमबाहेर पडू नका, भयानक अनुभव..; मसुरीच्या रिसॉर्टमधील जोडप्याचा Video व्हायरल, तुम्हीही बाळगा ही सावधगिरी!

फिरायला जाण्यापूर्वी किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर आपण राहण्यासाठी एखादं हॉटेल बुक करतो. परंतु बऱ्याचदा आपण त्या हॉटेलविषयी फारशी माहिती जाणून घेत नाही. मसुरीला फिरायला गेलेल्या एका जोडप्याला अत्यंत विचित्र अनुभव आला. जाणून घ्या, नेमकं काय घडलं..

रुमबाहेर पडू नका, भयानक अनुभव..; मसुरीच्या रिसॉर्टमधील जोडप्याचा Video व्हायरल, तुम्हीही बाळगा ही सावधगिरी!
Hotel Room
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2025 | 10:15 AM

मसुरीला फिरायला गेलेल्या एका जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. हे जोडपं मसुरीमधील ज्या हॉटेलमध्ये राहायला गेलं, तिथला हा व्हिडीओ आहे. हे हॉटेल भयानक असल्याचं त्यांनी म्हटलंय. “आम्हाला इथे राहायला खूप भीती वाटतेय. हे पहा, हॉटेलच्या भिंतींवर हे सगळं काय आहे? असं वाटतंय की ते इथून बाहेर येऊन आमच्यावर हल्ला करतील. हा वाघ, हा बिबट्या.. आणि इथे सर्वांची कातडी लटकवून ठेवली आहे”, अशा शब्दांत ते भीती व्यक्त करतात. इतकंच नव्हे तर रात्री रुमच्या बाहेर जायलाही भीती वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. या जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याला ‘हेरिटेज हॉटेल’ असं नाव दिलं आहे. तर यात घाबरायचं काहीच कारण नाही, असंही काहींनी म्हटलंय. हॉटेल बुकिंग केल्यानंतर पश्चात्ताप होऊ नये यासाठी आधीच तुम्ही काही गोष्टींची पडताळणी करू शकता.

या गोष्टी नीट तपासा-

  • हॉटेलच्या वेबसाइटवर तुम्ही तिथे राहिलेल्या पाहुण्यांचे रिव्ह्यू वाचू शकता आणि त्यांनी अपलोड केलेले फोटो किंवा व्हिडीओ पाहू शकता. हॉटेलच्या सुरक्षेबद्दल, चोरीच्या घटनांबद्दल आणि त्याच्या सभोवतालच्या असुरक्षित वातावरणाबद्दल कोणी काही चिंता व्यक्त केल्या आहेत का, हे तपासण्यासाठी रिव्ह्यू वाचा.
  • तुम्ही हॉटेलचं नेमकं स्थान तपासू शकता. जिथे गुन्हेगारी जास्त असते किंवा निर्जन स्थळी एखादं हॉटेल असेल तर त्या ठिकाणी जाणं टाळा.
  • हॉटेलच्या वेबसाइटवरील सर्व माहिती नीट वाचा. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित प्रवेशद्वार किंवा सुरक्षा रक्षक यांसारखे कोणते सुरक्षेचे उपाय आहेत का, ते पहा.
  • जर तुम्ही एकटे किंवा कुटुंबासह प्रवास करत असाल तर हॉटलेला कॉल करा आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल थेट विचारा.

चेन इन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती शक्य तितकी खासगी ठेवा. तुमचं पूर्ण नाव किंवा खोली क्रमांक मोठ्याने बोलू नका.
  • नेहमी वरच्या मजल्यावरची खोली निवडा. तळमजल्यावरची खोली निवडल्याने तुम्हाला अनेक समस्या जाणवू शकतात.
  • पायऱ्या किंवा बाहेर पडण्याच्या मार्गाजवळील खोल्या टाळा. ही ठिकाणं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असुरक्षित असू शकतात. कारण बाहेरील लोक सहजपणे तिथून जाऊ शकतात.
  • शक्यतो डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड वापरा. चुकीच्या व्यवहाराच्या बाबतीत क्रेडिट कार्ड तुमच्या माहितीचं चांगलं संरक्षण देतं.

हॉटेल रुम घेतल्यावर नीट तपासा

  • खोलीत प्रवेश करताच ताबडतोब दरवाजे आणि खिडक्या बंद करा.
  • तसंच लपवलेले कॅमेरे तपासा. असे कॅमेरे सहसा स्मोक डिटेक्टर, अलार्म किंवा एअर व्हेंट्ससारख्या ठिकाणी लपवले जाऊ शकतात.
  • बेडखाली, कपाटाच्या आत आणि बाथरुममध्ये कोणी लपलं आहे का ते तपासा.
  • तसंच दरवाजा आणि कुलूप तपासा. चेन, लॅच आणि डेडबोल्ट व्यवस्थित काम करतंय का ते पहा.
  • सर्व दिवे चालू करा. बेड, खुर्च्या आणि कार्पेटवर काही कीटक आहेत का ते काळजीपूर्वक पहा.
  • सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं चालू करून पहा. त्यापैकी एखादं काम करत नसेल तर हॉटेल कर्मचाऱ्यांना ताबडतोब कळवा.