नाचता नाचता तोंडावरच पडली, काय तो उत्साह!

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लग्नाला येणारे पाहुणे फक्त दोनच गोष्टींकडे बघत असतात, पहिली गोष्ट म्हणजे फूड स्टॉल आणि दुसरा डान्स फ्लोअर..!

नाचता नाचता तोंडावरच पडली, काय तो उत्साह!
laughing meme
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 6:24 PM

टिकटॉक आणि इन्स्टा रीलच्या जमान्यात प्रत्येकजण आपापले व्हिडीओ शेअर करण्यात मग्न असतो. अनेकदा जगभरातून असे डान्स व्हिडिओ समोर येतात, जे एकतर तुम्हाला हसवतात किंवा लोक स्तब्ध होतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. डान्सचा हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला असून नेटिझन्स तो एकमेकांसोबत जोरदार शेअर करत आहेत.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लग्नाला येणारे पाहुणे फक्त दोनच गोष्टींकडे बघत असतात, पहिली गोष्ट म्हणजे फूड स्टॉल आणि दुसरा डान्स फ्लोअर..!

डान्स फ्लोअरवर उतरताच नॉन डान्सर्सही प्रोफेशनल डान्सर बनतात आणि डान्स करायला सुरुवात करतात. तर काही लोक असे असतात जे फक्त डान्स फ्लोअर पाहून भान हरवून जातात आणि उत्साहाने असे परफॉर्मन्स देऊ लागतात की बास्स! मग या अशा उत्साहात काहीही होऊ शकतं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी डान्स फ्लोअरवर डीजेच्या तालावर डान्स करू लागते. तिचा डान्स पाहता तिने त्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे समजू शकते. तेथे उपस्थित पाहुणेही तिला छान चिअर करतात. सगळं छान चालू असतं पण उत्साहात तिचा पाय जमिनीवर घसरतो. ती सरळ तोंडावर खाली पडते.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ थेजिस्टिक्स नावाच्या हँडलने शेअर केला आहे. ही बातमी लिहिताना पाच हजारांहून अधिक लोकांनी लाइक आणि कमेंट्स केल्या असून त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली, ‘बिचारीला खूप इजा झाली असेल’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘त्यामुळे उत्साहात भान हरपू नये असं म्हटलं जातं’.