AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 states Poll Schedule : पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, मदतान कधी निकाल कधी? वाचा A टू Z

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सर्व निवडणूक कार्यक्रम सांगितला आहे.

5 states Poll Schedule : पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, मदतान कधी निकाल कधी? वाचा A टू Z
west bengal assam tamil nadu kerala puducherry poll scheduleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2026 | 4:43 PM
Share

Vidhan Sabha Poll Schedule for 5 states : गेल्या अनेक दिवसांपासून देशात पश्चिम बंगाल, आसाम यासार इतरही तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा चालू होती. या निवडणुकीची घोषणा नेमकी कधी होईल? असे विचारले जात होते. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी राजकीय पक्षांकडून तयारीही केली जात होती. विशेष म्हणजे ज्या राज्यांत निवडणूक होणार आहे, तेथे सत्ताधारी भाजपा तसेच तेथील प्रादेशिक पक्षांकडून मोठ्या सभांचे आोयजन केले जात होते. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही सभा घेतल्या आहेत. दरम्यान, आता देशातील एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपली असूल निवडणूक आयोगाने आज (15 मार्च) पत्रकार परिषद घेऊन एकूण या सर्व राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांची तर पुद्दुचेरी या केंद्रसाशित प्रदेसात निवडणूक होणार आहे. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे.

कोणत्या राज्यात कधी मतदान, कधी निकाल?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ या दोन राज्यांत तसेच पुद्दुचेरी या केंद्रशाशित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल.  तामिळनाडू येथे 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर पश्चिम बंगाल या एमेकव राज्यात दोन 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होईल. या सर्व चार राज्ये तसेच एका केंद्रशाशित प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे.

मतदान कधी होणार, निकाल कधी लागणार?

आसाम

मतदान – 9 एप्रिल

निकाल- 4 मे

केरळ

मतदान – 9 एप्रिल

निकाल – 4 मे

पुद्दुचेरी

मतदान – 9 एप्रिल

निकाल – 4 मे

तामिळनाडू

मतदान – 23 एप्रिल

निकाल – 4 मे

बंगाल – दोन टप्प्यांत निवडणूक

मतदान – 23 एप्रिल आणि 29 एप्रिल

निकाल – 4 मे

दरम्यान, या निवडणुकीत पश्चिम बंगाल या राज्याकडे सर्वांचेच लक्ष असेल. कारण या राज्यातील तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यापुढे सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान असेल. दक्षिणेकडील राज्यांतही नेमकं काय होणार? भाजपाचा जनाधार वाढणार का? याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली