AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crude Oil Price : 5 महिन्यांनी गुड न्यूज ! कच्चा तेलाच्या किमती कोसळल्या, भारतात आता..

मध्यपूर्वेतील तणाव निवळल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट जागतिक बाजारासाठी दिलासादायक ठरली आहे. अमेरिकन आणि 'ब्रेंट' (Brent) कच्च्या तेलाच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. मात्र, भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत त्वरित घट होणार नाही, कारण त्या कर आणि चलन विनिमय दरांवर अवलंबून असतात. तरीही, यातून सामान्य जनतेला भविष्यात दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

Crude Oil Price :  5 महिन्यांनी गुड न्यूज ! कच्चा तेलाच्या किमती कोसळल्या, भारतात आता..
Image Credit source: Anton Petrus/Moment/Getty Images
| Updated on: Aug 03, 2026 | 8:07 AM
Share

बऱ्याच काळानंतर जगासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला इराणविरोधातील नवे हल्ले थांबवण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले. तसेच, मध्यपूर्वेतील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठीचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केला. मात्र, रविवारी रात्री अमेरिकन क्रूड तेलाच्या किमती संघर्ष सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत अजूनही सुमारे 20 टक्क्यांनी अधिक होत्या.

अमेरिकन आणि ब्रेंट क्रूडच्या किमती घसरल्या

रविवारी रात्री अमेरिकन क्रूड तेलाची किंमत 5 टक्क्यांनी घसरून 80.79 डॉलर प्रति बॅरल झाली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मानक मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडची किंमतही 5 टक्क्यांनी घसरून 83.87 डॉलर प्रति बॅरलवर आली. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर जागतिक तेलबाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली. वसंत ऋतूमध्ये अनेकदा कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या होत्या.

5 महिन्यांनी मिळणार दिलासा ?

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे फारसच्या आखातातून तेलवाहू जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. संघर्ष संपल्यास अडकून पडलेले तेलवाहू टँकर पुन्हा मार्गस्थ होतील आणि जागतिक पुरवठा साखळीला मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे जगाचं लक्ष आता इथेच एकवटलं आहे.

सामान्य जनतेच्या खिशावर भार

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (ATF) यांच्या दरांवर झाला. परिणामी, वाहतूक खर्च वाढल्याने प्रवाशांना अधिक भाडं मोजावं लागलं. काही देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने रेशनिंग लागू करण्यात आलं, तर काही ठिकाणी शाळा आणि सरकारी कार्यालये तात्पुरती बंद ठेवावी लागली. एकंदरच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला, त्याचं बजेट कोलमडलं आणि खिशावर मोठा भार पडला.

अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या संघर्षादरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्या. या परिस्थितीचा फायदा तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांना झाला असून, त्यांनी विक्रमी नफा कमावला.

पेट्रोल-डिझेलचे दर लगेच का कमी होत नाहीत?

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर त्वरित कमी होतील, असं नसतं. यामागे ‘पास-थ्रू इफेक्ट’ हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजेच, कच्च्या तेलाच्या दरातील बदलाचा किती परिणाम किरकोळ इंधन दरांवर होतो, हे प्रत्येक देशाच्या धोरणांवर अवलंबून असते.

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पूर्णपणे मुक्त बाजारावर आधारित नाहीत, तसेच त्या संपूर्णपणे सरकारी नियंत्रणाखालीही नाहीत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर, रुपया-डॉलर विनिमय दर, रिफायनिंगचा खर्च, वाहतूक खर्च आणि केंद्र-राज्य सरकारांचे कर या सर्व बाबींचा विचार करून तेल कंपन्या इंधनाचे दर निश्चित करतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा किंवा घटीचा परिणाम किरकोळ दरांवर काहीसा उशिराने आणि मर्यादित प्रमाणात दिसून येतो.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी