AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Bypoll Results : प्रशांत किशोर जिंकणार की हरणार? आज पोटनिवडणुकांचे निकाल, सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा मूड समजणार

Assembly Bypoll Results : फक्त राजकीय पक्षांसाठीच ही निवडणूक महत्वाची नाही, तर राजकीय विश्लेषकांचं सुद्धा या निवडणूक निकालावर लक्ष असेल. कारण नुकतचं देशात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन झालं. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Assembly Bypoll Results : प्रशांत किशोर जिंकणार की हरणार? आज पोटनिवडणुकांचे निकाल, सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा मूड समजणार
prashant kishor
| Updated on: Aug 03, 2026 | 8:19 AM
Share

तीन राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. बिहारच्या बांकीपूर, मध्य प्रदेशच्या दतिया आणि गुजरातच्या मांजलपूर या तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. आज सोमवारी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये जनसुराज पार्टीच संस्थापक प्रशांत किशोर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दतियामध्ये भाजपं उमेदवार आशुतोष तिवारी यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. दतियामध्ये भाजपचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याजागी आशुतोष तिवारी यांना उमेदवार बनवण्यात आलं. नरोत्तम मिश्रा यांना तिकिट दिलं नाही म्हणून दतियामध्ये मोठा गदारोळ झाला. हिंसक विरोध प्रदर्शन झालं होतं. नंतर नरोत्तम मिश्रा यांना आशुतोष तिवारी यांच्यासाठी प्रचार केला होता.

फक्त राजकीय पक्षांसाठीच ही निवडणूक महत्वाची नाही, तर राजकीय विश्लेषकांचं सुद्धा या निवडणूक निकालावर लक्ष असेल. कारण नुकतचं देशात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन झालं. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकार विरुद्ध पहिल्यांदाच इतकं मोठं आंदोलन झालं. लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या जन भावनांचा या पोटनिवडणुकीवर कितपत परिणाम झालाय हे सुद्धा या निकालांमधून दिसेल.

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर रिंगणात

बिहारच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेवर सर्वांचच लक्ष आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर इथून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी आपल्या राजकीय रणनितीने इतर पक्षांना मोठं यश मिळवून दिलं. पण प्रशांत किशोर यांना अजून स्वत:ला तसं यश मिळवता आलेलं नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसूराज पक्षाचा दारुण पराभव झाला. बिहारच्या बांकीपूरमधून ते निवडणूक रिंगणात आहेत. तिथे सर्वात कमी 34.30 टक्के मतदान झालं आहे. गुजरातच्या मंजलपूरमध्ये 37.50 टक्के आणि मध्य प्रदेशच्या दतिया सीटवर सर्वात जास्त 71.44 टक्के मतदान झालय.

ही जागा भाजपचा बालेकिल्ला 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यानंतर बिहारच्या बांकीपूरची जागा रिक्त झाली. भाजपने इथून नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिलीय. ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. पण प्रशांत किशोर रिंगणात असल्याने निकालाबद्दल उत्सुक्ता निर्माण झाली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी