AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : सरकारी परिचारिकांचे उद्या दोन तास कामबंद आंदोलन

| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 7:54 AM
Share

राष्ट्रवादी, शिवसेना,काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आज मुबंई प्रदेश अध्यक्ष याच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश होणार आहे. तर अनेक ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Maharashtra News LIVE : सरकारी परिचारिकांचे उद्या दोन तास कामबंद आंदोलन

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी, शिंदे तसेच ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या वाशिम जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश होतोय. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, माजी सदस्य आणि इतर पदाधिकारी आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वात मुबंई प्रदेश अध्यक्ष याच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. तर, जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला असून सद्यस्थितीला ही नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे, त्यामुळे रब्बी हंगामातीलही चिंता आता मिटण्याची चिन्हे दिसू लागली असून विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळी देखील वाढवण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर, नाशिक शहरात डेंग्यूचे 31 रुग्ण आढळले आहेत. शहरात डेंग्यूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना महापालिकेची डास नियंत्रण मोहीमच विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Aug 2026 08:59 PM (IST)

    कल्याण : आंबिवलीत दोन कुटुंबांमध्ये तुफान राडा

    कल्याणजवळील आंबिवलीतील गणेश पाटील नगर परिसरात पूजेच्या कार्यक्रमादरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद होऊन राडा झाला आहे. शिवलिंग स्थापना आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमावेळी झालेल्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 03 Aug 2026 08:40 PM (IST)

    पुणे : बंगल्यात बिबट्याचा शिरकाव

    पुणे शहरातील विमाननगर लोहगाव परिसरातील हरणतळे वस्ती येथे मध्यरात्री बिबटय़ाने एका बंगल्यात प्रवेश करून तेथील कुत्र्यावर हल्ला केला. यावेळी कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • 03 Aug 2026 08:25 PM (IST)

    सरकारी परिचारिकांचे उद्या दोन तास कामबंद आंदोलन

    उद्या राज्यभर सरकारी परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन असणार आहे. सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत जिल्हास्तरावर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. सेवा प्रवेश नियम, पदोन्नती आणि भरती रखडल्याने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.

  • 03 Aug 2026 08:10 PM (IST)

    श्रीगोंद्यात मोठी कारवाई, बाळासाहेब नाहटा पुणे पोलिसांच्या ताब्यात

    पुणे पोलिसांनी श्रीगोंद्यात मोठी कारवाई केली आहे. राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांना ताब्यात घेतले आहे. नहाटा यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात 2025 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते अनेक महिन्यांपासून फरार होते. आता त्यांना श्रीगोंदा पोलिसांच्या समन्वयाने अटक केली आहे.

  • 03 Aug 2026 07:51 PM (IST)

    डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा नाही; न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

    डोंबिवलीतील गाजलेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर चार आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कल्याण सत्र न्यायालयात आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (VC) सुनावणी पार पडली. यावेळी रमेश म्हात्रे आभासी पद्धतीने हजर होते.

  • 03 Aug 2026 06:34 PM (IST)

    गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

    गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

    3387 क्युसेस वेगाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

    2013 क्युसेस वेगाने सुरू असलेला विसर्ग 1374 ने वाढवला

    गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

    सध्या शहरात पावसाची विश्रांती, मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा गोदावरी नदी पात्रात विसर्ग

    गोदावरी नदी काठ परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

    रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी

  • 03 Aug 2026 06:15 PM (IST)

    प्रॉपर्टीच्या वादातून जावयाने उचललं टोकाचं पाऊल

    प्रॉपर्टीच्या वादातून जावयाची रहाटी शिवरातील पूर्णा नदी उडी घेत आत्महत्या

    बाळाप्रसाद कवले असं मृत व्यक्तीचं नाव

    बाळाप्रसाद कवले वसमत शहरातील राहिवाशी असल्याची माहिती

    आत्महत्या करण्यापूर्वी मृत व्यक्तीने काढला 19 मिनिटाचा व्हिडीओ

    सासरच्या व्यक्तींनी मानसिक त्रास आणि बदनामी केल्याचा आरोप

  • 03 Aug 2026 05:54 PM (IST)

    बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी

    बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जन सूराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी भाजपचे नीरज कुमार यांचा 18953 मतांनी पराभव केला.

  • 03 Aug 2026 05:45 PM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनेत्रा पवार यांना पत्र

    केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. एनसीपी पक्ष घटनेतल्या बदलाबद्दलची कागदपत्रं सादर करण्याचं आव्हान निवडणूक आयोगाने केलं आहे. हे बदल 26 फेब्रुवारीला करण्यात आले होते. त्याचा प्रस्ताव आता सादर करण्यास सांगितला आहे. 27 जुलैला हे पत्र पाठवण्यात आलं आहे.

  • 03 Aug 2026 05:35 PM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात बाचाबाची

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात शा‍ब्दिक बाचाबाची झाली. मातोश्रीवर ठाणे कल्याणच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाचाबाची झाली. दोन गटातील बाचाबाची पाहून उद्धव ठाकरेही संतापले. एक तरूण देशात मोदींना आव्हान देतोय, तुम्ही भांडताय काय? असा संताप यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

  • 03 Aug 2026 05:26 PM (IST)

    आमदार रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

    आमदार रोहित पवार यांची प्रकृती खराब झाल्याने तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी रोहित पवार वांद्रे येथील एसआरए कार्यालयात आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. ही बैठक संपल्यानंतर काही वेळातच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि शारीरिक त्रास जाणवू लागला. त्यानंतर रुग्णालयात दाखल झाले आहेत.

  • 03 Aug 2026 05:21 PM (IST)

    विश्वेश नेगी यांची इराणमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती

    राजनयिक विश्वेश नेगी यांची इराणमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

  • 03 Aug 2026 05:14 PM (IST)

    ठाणे: खड्ड्यामुळे टीडीआरएफ जवानाचा मृत्यू

    ठाण्यात खड्ड्यामुळे ठाणे आपत्ती निवारण दलाच्या (टीडीआरएफ) एका जवानाचा मृत्यू झाला. शहापूरहून ठाण्याकडे प्रवास करत असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात पडल्याने ठाणे महानगरपालिकेचे टीडीआरएफ जवान विकास लाहू गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • 03 Aug 2026 05:06 PM (IST)

    आरएसएस प्रमुख मोहन भागवत 6 ऑगस्टला Gen Z आणि अल्फा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

    लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीमध्ये देशातील तरुणांचा वाढता सहभाग पाहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख डॉ. मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (एनएमएसीसी) जेन झी आणि जनरेशन अल्फा विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

  • 03 Aug 2026 04:58 PM (IST)

    ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा संताप; समुद्राळ येथील साखर कारखान्याला ठोकले टाळे

    ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा संताप; समुद्राळ येथील साखर कारखान्याला ठोकले टाळे. उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील क्यू एनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन. भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना स्वर्गीय अजित पवार यांच्या क्यू एनर्जी इंडस्ट्रीज कडे चालवण्यासाठी आहे. औसा, उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ऊस बिले अदा न दिल्याने शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त.

  • 03 Aug 2026 04:50 PM (IST)

    रिक्षाचालकांची मराठी शिकण्यासाठी ओशिवरात प्रचंड गर्दी

    महाराष्ट्र परिवहन विभागाने दिलेल्या 15 ऑगस्टच्या मुदतीनंतर आता रिक्षाचालक मालक मराठी शिकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ओशिवरा येथे आजही त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

  • 03 Aug 2026 04:40 PM (IST)

    मावळातील पवना धरण शंभर टक्के भरले

    मावळातील पवना धरण शंभर टक्के भरले…. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू… मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पवना माईचे विधिवत जलपूजन करून जलसंवर्धनाचा केला संकल्प…

  • 03 Aug 2026 04:31 PM (IST)

    शिक्षण, विद्यार्थी, बेरोजगारीवर सरकारनं मौन सोडावं-काँग्रेस

    E20च्या मुद्द्यावरुन नागपुरात काँग्रेसचा गडकरींविरोधात मोर्चा. गडकरींच्या घराकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला. शिक्षण, विद्यार्थी, बेरोजगारीवर सरकारनं मौन सोडावं-काँग्रेस

  • 03 Aug 2026 04:20 PM (IST)

    खडकवासला धरणातून 29 हजार क्यूसेकसने पाण्याचा विसर्ग

    खडकवासला धरणातून 29 हजार क्यूसेकसने पाण्याचा विसर्ग….खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा…. खडकवासला धरण साखळीतील सर्व धरण भरल्याने पाण्याचा वाढत आहे विसर्ग….

  • 03 Aug 2026 04:10 PM (IST)

    पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल

    पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल. जातीपातीचं राजकारण यानंच आणलं, आता उशीरा का होईना शहाणपण आलं-जरांगे

  • 03 Aug 2026 03:50 PM (IST)

    विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावर शेकडो खड्डे

    मुक्ताईनगर तालुक्यातील खानदेश विदर्भाला जोडणारा मुक्ताईनगर कु-हा काकोडा जाणारा रस्त्यावर शेकडो खड्डे. पाच पाच फुटापर्यंत खड्ड्याचा आकार एवढे मोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे. शेकडो वाहने या रस्त्यावरून जातात वाहनधारक त्रस्त झाले आहे. एक मंत्री तीन आमदार मतदार संघात असूनही रस्त्याची स्थिती खराब नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे

  • 03 Aug 2026 03:40 PM (IST)

    TET परीक्षा रद्दच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

    MPSC पेपरफुटी, MHT-CET घोटाळा आणि TET परीक्षा रद्दच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आणि जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. राज्यात सातत्याने पेपरफुटी होत असून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची आंदोलकांची मागणी

  • 03 Aug 2026 03:30 PM (IST)

    तुला उशिरा का होईना शहाणपण आलं; धनंजय मुंडेच्या वक्तव्यावर जरांगेचीं प्रतिक्रिया

    जातीपातीचं राजकारण यानेच आणलं, सगळ्याच जातीपातीच्या लोकांचा कार्यक्रम केला. बलात्कार करणाऱ्याला सांभाळावं लागेल असं म्हणतो. आता तु पाश्चातात करायला लागला.. तुला उशिरा का होईना शहाणपण आलं बरं झालं. आणि तुझ्यामुळे बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय.. फक्त तुझ्यामुळे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 03 Aug 2026 03:20 PM (IST)

    तु शहाणा हो मराठ्यांच्या नादी लागू नको; मनोज जरांगे धनंजय मुंडेंविषयी स्पष्ट बोलले

    जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, मराठ्यांसह सगळ्या जातींनी मोठं केलं आणि टोळीने ओरबाडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊ दिला ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला. तु शहाणा हो मराठ्यांच्या नादी लागू नको. कोणताही पक्ष, कोणीही तुला जवळ करणार नाहीत. काळ यायचा काळ गेला आता मध्ये जायचा वेळ आला आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 03 Aug 2026 03:10 PM (IST)

    खरोखर या दोघांनी एक्झिट व्हायला हवं- करुणा मुंडे

    पंकजा मुंडे यांनी काल सांगितले की मला एक्झिट पाहिजे आणि धनंजय मुंडे आज सकाळी सांगितलं की या गलिच्छ राजकारणामध्ये मी राहू की नाही. जर हा प्रश्न येतो आहे तर खरोखर या दोघे भाऊ बहिणींना एक्झिट व्हायला पाहिजे आणि परली बीडमध्ये मला संधी द्यायला पाहिजे असे करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

  • 03 Aug 2026 02:55 PM (IST)

    नाशिक आणि ठाण्यामधील खड्ड्यांवरील अपघात प्रकरणावर मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक

    मनसे नेते अविनाश जाधव  म्हणाले की, ” दरवर्षी पावसाळा आला की नाशिक रोड आणि ठाण्यामध्ये खड्डे पडतात, पावसाळा सुरू व्हायच्या आधी आम्ही अधिकारी वर्गाला पत्र व्यवहार करत असतो. राजकीय नेते यांना देखील सतत सांगत असतो की पावसाळा आधी या खड्ड्यांचा बंदोबस्त करा. नाशिक रोडचा एक्सप्रेस हायवेवर रूपांतर करत आहेत. त्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण सुरू आहे. या ठिकाणी लोकांचे मृत्यू होतात. सरकार आहे कुठे ? ठाण्यातले पालकमंत्री आहे कुठे ? एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल. पालकमंत्री ला अजूनही जाग आली नाही. सरकारला जाग येत नसेल तर आपण प्रश्न कोणाला विचारायचे. तुम्ही आता आमदारा,खासदार, मंत्री फोडण्याच्या मागे लागले आहात.”

  • 03 Aug 2026 02:45 PM (IST)

    जंतरमंतरवरील Gen Z आंदोलनानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर

    जंतरमंतरवरील Gen Z आंदोलनानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर. 2029 ला 38 कोटी तरुण मतदार होणार असल्याने सेना आता मास्टरप्लान आखणार आहे. Gen Z चेहऱ्यांचे नेतृत्त्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार आहे. तरुणांचे नेतृत्त्व करणाऱ्या युवा चेहऱ्यांवर सेना काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

  • 03 Aug 2026 02:40 PM (IST)

    पंकजा ताई हवं तर राजकारण सोहतील पण BJP सोडणार नाही- करुणा मुंडे

    करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया “मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की तुम्ही असं परत परत ऑफर देऊ नका, कारण कसं आहे पंकजा ताई कधीही BJP सोडणार नाही, हवं तर राजकारण सोहतील पण BJP सोडणार नाही. आता येणार काळ हा काँग्रेसचा आहे आणि त्याच्याकडे असे अनेक चेहरे आहेत जे मुख्यमंत्री बनू शकतात, त्यामुळे पंकजा ताईंची गरज आहे असं मला नाही वाटतं.”

  • 03 Aug 2026 02:35 PM (IST)

    चांदवड तालुक्यातील राहुड एम आय टॅंक धरण 80 टक्के भरले

    चांदवड तालुक्यातील राहुड एम आय टॅंक धरण 80 टक्के भरले. राहुल उसवड या दोन गावांच्या पाणी योजनेला होणार मोठा फायदा. राहुल उसवड सह आठ ते दहा गावातील शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण.

  • 03 Aug 2026 02:30 PM (IST)

    मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRFच्या जवानाचा मृत्यू प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

    मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRFच्या जवानाचा मृत्यू झाला. यावर आता रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. रोहित पवार म्हणाले की, ” याच जवानाने भिवंडी इमारत दुर्घटनेत देवदूत म्हणून अनेकांचे प्राण वाचवले होते. पण मुंबई-नाशिक महामार्गावरील भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात जवानाला प्राण गमवावे लागले, हे अत्यंत वेदनादायी आहे. अपघाताची आणि रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा अशी आमची सरकारकडे मागणी आहे.”

  • 03 Aug 2026 02:20 PM (IST)

    दिल्ली CJP लाठीचार्ज प्रकरणी मोठी अपडेट

    दिल्ली CJP लाठीचार्ज प्रकरणी मोठी अपडेट आता समोर आली आहे. आता या प्रकरणावर कोर्टाने एक आदेश दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, ” सर्व राज्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिसांनी त्यांच्या सोयीनुसार कारवाई करावी.”

  • 03 Aug 2026 02:15 PM (IST)

    लोकसभेत विरोधकांकडून अमित शाहांविरोधी घोषणाबाजी करण्यात आली

    लोकसभेचे कामकाज सुरु असताना विरोधकांची घोषणाबाजी सुरु झाली. लोकसभेत विरोधकांकडून अमित शाहांविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात यावं अशी मागणी विरोधकांनी केली.

  • 03 Aug 2026 02:06 PM (IST)

    आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची अचानक SRA च्या कार्यालयाला भेट

    आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी SRA च्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. SRA च्या प्रलंबित कामांवरुन दोन्ही नेत्यांनी भेट घेतली आहे.

  • 03 Aug 2026 02:03 PM (IST)

    उपमुख्यमंक्षी सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर आता उपमुख्यमंक्षी सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये. सुनेत्रा पवार यांनी NCP च्या मंत्र्यांकडून कामाचा रोडमॅप मागितला आहे. मंत्र्यांकडून सहा महिन्यांचा अहवाल मागितला आहे.

  • 03 Aug 2026 02:01 PM (IST)

    रोहित पवार यांची आदित्य ठाकरे यांच्यासोबत एसआरए कार्यालयात अचानक भेट

    शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ करमाळयात रिमझिम पावसात आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला करमाळयात रिमझिम पावसात दुग्धाभिषेक करत आंदोलन करण्यात आलं. करमाळयातील सुभाष चौकात दुग्धभिषेक आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर संजय राऊतांच्या विरोधात भाजपकडून काल करमाळयात जोडे मारो आंदोलन करत निदर्शनं करण्यात आली होती. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांचं समर्थन केलं जात आहे.

  • 03 Aug 2026 01:38 PM (IST)

    नागपुरात युवक काँग्रेसकडून आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू

    नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. इ- 20 , शिक्षण, विद्यार्थी, बेरोजगारी आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारने मौन सोडावं, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे. या मोर्चाची सुरुवात महाल इथल्या चिटणीस पार्क चौकातून झाली असून पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे.

  • 03 Aug 2026 01:34 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचं आमरण उपोषण सुरू

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचं आमरण उपोषण सुरू आहे. आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेत 202 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. खासदार इम्तियाज जलील उपोषणात सहभागी झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरु असलेल्या उपोषणात 300 ठेवीदारांचा सहभाग आहे. ठेवी परत करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

  • 03 Aug 2026 01:23 PM (IST)

    बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराजचे प्रशांत किशोर आघाडीवर

    बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराजचे प्रशांत किशोर आघाडीवर असून भाजपचे नीरज कुमार दुसऱ्या क्रमांकावर आघाडीवर आहेत. बिहार, मध्य प्रदेश, गुजराजमध्ये पोटनिवडणुका झाल्या असून आज मजमोजणी सुरू आहे. प्रशांत किशोर यांच्या समर्थकांकडून सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. 11 व्या फेरीनंतर प्रशांत किशोर हे 6646 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 03 Aug 2026 01:15 PM (IST)

    सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भात मंडल जनगणना यात्रा

    सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भात मंडल जनगणना यात्रा काढण्यात येत आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी सकल ओबीसी महामोर्चाकडून केली जात आहे.

  • 03 Aug 2026 01:06 PM (IST)

    खड्ड्यांमुळे लोकांचा मृत्यू होतोय, तरी प्रशासनाला अजून जाग येत नाही- अविनाश जाधव

    पावसाळ्याआधी खड्डे बुजवणं गरजेचं आहे. पावसाळा सुरू झाला की खड्ड्यांचा त्रास सुरूच असतो. ठाण्याचे पालकमंत्री आहेत तरी कुठे? कुठेही पालकमंत्री बोलताना दिसत नाहीत. खड्ड्यांमुळे लोकांचा मृत्यू होतोय, तरी प्रशासनाला अजून जाग येत नाही, अशी टीका मनसेच्या अविनाश जाधव यांनी केली आहे.

  • 03 Aug 2026 12:51 PM (IST)

    मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, आणखी एकाचा गेला बळी

    मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य असून त्यामुळे TDRF जवानाचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण महामार्गावर खड्डेच खड्डे असून त्यामुळे आणखी एका व्यक्तीला आता जीव गमवावा लागला आहे.

  • 03 Aug 2026 12:50 PM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी.

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.  आरोपी महेश केदार याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितला. कोर्टाने पुढील तारीख 5 ऑगस्ट दिली आहे.   निशाणी क्रमांक 211, 212 आणि 213 या अर्जामध्ये एकत्रित दोषारोप पत्र करता येत नाहीत,  अशा आशयाचा अर्ज आहे. या संदर्भात आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला.  ते प्रकरण प्रलंबित आहे म्हणून कोर्टाने हे तीन अर्ज तात्पुरत्या स्वरूपात आहे त्या परिस्थितीत ठेवले आहेत.

  • 03 Aug 2026 12:42 PM (IST)

    राज्यात ऑपरेशन टायगर सक्रिय आहे , सांगून पक्ष प्रवेश होत नाहीत – संजय घाडी यांच्या विधानाने खळबळ

    राज्यात ऑपरेशन टायगर सक्रिय आहे , सांगून पक्ष प्रवेश होत नाहीत. मनपातही ऑपरेशन टायगर सक्रिय असं विधान संजय घाडी यांनी  केलं असून त्यामुळे खळबळ माजली आहे.

    अनेक नगरसेवकांची सत्तेसोबत येण्याची इच्छा , त्यामुळे कामं होतात, असा त्यांचा मानस आहे. लवकरच ठाकरेंचे बरेचसे नगरसेवक हे आमच्या शिवसेनेत येतील , असंही घाडी म्हणाले असून त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • 03 Aug 2026 12:23 PM (IST)

    नाशिकमध्ये लावलेल्या बॅनर्सवर नाराजी व्यक्त केली- छगन भुजबळ

    नाशिकमध्ये लावलेल्या बॅनर्सवर नाराजी व्यक्त केली. ज्यांनी बॅनर्स लावले, मी ते काढायला सांगितले आहेत. मी जे बोललो त्याचा अर्थ काम सुधारा असा होतो, मला पालकमंत्री करा असा नव्हे – छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण

  • 03 Aug 2026 12:20 PM (IST)

    डोंबिवली MIDC मध्ये झाड कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच; वाहनांचं नुकान

    डोंबिवली MIDC मध्ये झाड कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.  दोन ठिकाणी झाडे पडून वाहनांचं नुकसान झालं. शाळेजवळ मोठा अनर्थ टळला.  सुदर्शन नगर येथील ओम अगत्य सोसायटीमध्ये औदुंबराचे झाड कोसळून दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

    माणिक रत्न सोसायटी परिसरातील भलेमोठे आंब्याचे झाड अचानक उन्मळून पडले.  हे झाड सोसायटीची तसेच शिवाई बालक मंदिर शाळेची संरक्षक भिंत फोडून कोसळले. मात्र कोणीही जखमी झालेलं नाही.

  • 03 Aug 2026 12:06 PM (IST)

    उल्हासनगर मध्ये भरधाव एर्टीगा कारची दुचाकीला धडक, 2 जखमी

    उल्हासनगर मध्ये भरधाव एर्टीगा कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघाता 2 तरुणी गंभीर जखमी झाल्या.  कल्याण बदलापूर महामार्गावरील साईबाबा मंदिर परिसरात रविवारी मध्यरात्री 1 वाजता हा अपघात झाला.  दुचाकीला धडक देत साईबाबा मंदिराच्या कंपाऊंडला एर्टीगा कार धडकली.  एर्टीगा कार भरधाव वेगात होती अशी  माहिती प्रत्यक्षदर्शींंनी दिली.

  • 03 Aug 2026 11:58 AM (IST)

    पंतप्रधानांनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी , दीपकेंची मागणी

    पंतप्रधानांनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी , अशी मागणी अभिजीत दीपके यांनी केली. त्यांच्या परदेशी शिक्षणावर सवाल उपस्थित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांकडे ही मागणी केली.

  • 03 Aug 2026 11:50 AM (IST)

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : आज महत्त्वाची विशेष सुनावणी होणार

    बीडचे विशेष मकोका न्यायालयात आज विशेष सुनावणी होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या साक्षी पुराव्याच्या स्टेज वर आहे. या प्रकरणांमध्ये आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, इतरही कागदांची जंत्री करण्यात येणार आहे. तसेच आरोपी पक्षाकडून देण्यात आलेल्या अर्जांवर ही न्यायालयात युक्तिवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 03 Aug 2026 11:42 AM (IST)

    सोलापुरात संजय राऊताच्या समर्थनार्थ ठाकरे गट रस्त्यावर

    सोलापुरात संजय राऊताच्या समर्थनार्थ ठाकरे गट रस्त्यावर उतरली आहे. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक केला. तर काल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

  • 03 Aug 2026 11:30 AM (IST)

    माळशेज घाट पूर्ण बंद; पर्यायी रस्त्यावरील खड्ड्यांनी पर्यटक हैराण

    पुण्यातील माळशेज घाट मार्ग बंद आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना खिरेश्वर–पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरलगतच्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागतोय. मात्र या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक ठरत आहे. यावरून पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

  • 03 Aug 2026 11:18 AM (IST)

    पुण्यात ABVP चं आंदोलन

    पुण्यात COEP कॉलेजच्या विरोधात ABVP ने आंदोलन केलं. COEP कॉलेजच्या फी वाढी विरोधात कॉलेज प्रशासनाचा ABVP ने निषेध केला. कॉलेज प्रशासनाकडून पदवी शिक्षणाची फी अचानक वाढवण्यात आली, परंतु नियमाच्या बाहेर जाऊन फी वाढ केल्याचा आरोप करत ABVP ने केला. त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं.

  • 03 Aug 2026 11:07 AM (IST)

    लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गोंधळ; कामकाज स्थगित

    लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू झालं. दोन्ही सभागृह सुरू झाल्यानंतर काही वेळात विरोधकांनी गोंधळ घालण्यात सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.

  • 03 Aug 2026 10:50 AM (IST)

    गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य दहीहंडीचे आयोजन

    दरवर्षी गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करून तरुणाईला आकर्षित करण्याचा मोठा प्रयत्न केला जातो. मात्र यावर्षी भाजप स्वतः अमरावतीत दहीहंडी साजरी करणार असल्याचे आवाहन खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. दहीहंडी कुठे आणि कशी घ्यायची हे महापौर आणि आमदार प्रवीण पोटे यांनी ठरवावे असे निर्देश बोंडे यांनी दिले आहे.

  • 03 Aug 2026 10:45 AM (IST)

    ब्रिजभूषण सिंह यांची निर्दाेष मुक्तता

    महिला कुस्तीपट्टू आरोप करणारे ब्रिजभूषण सिंह यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. दिल्लीतील कोर्टात याबाबत सुनावणी सुरू होती. आता त्यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली.

  • 03 Aug 2026 10:40 AM (IST)

    हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले

    2 लाख हजार 34 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आले. नदी काठावर न जाण्याचा आव्हान प्रशासनाने केला आहे

  • 03 Aug 2026 10:30 AM (IST)

    जळगावातील पाळधी तरसोद बायपासवरील दुरुस्तीमुळे मार्गात तात्पुरता बदल

    संभाजीनगर मार्गावरील वाहने जामनेर मार्गे तर गुजरात, मध्यप्रदेश राज्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहने चोपडा मार्गे वळविली. मार्गात बदल केल्याबाबतची अधिसूचना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढली आहे. मुंबई-नागपूर मार्गावरील वाहने जळगाव शहरातून वळविण्यात आली आहेत.

  • 03 Aug 2026 10:20 AM (IST)

    ऑगस्ट उजाडला, तरी पाण्याची चिंता कायम

    धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने ऑगस्ट महिना सुरू होऊनही जिल्ह्यातील 226 जलप्रकल्पांमध्ये केवळ 8.5 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 225 मिमी पावसाची नोंद झाली असून, या कालावधीत सुमारे 260 मिमी पाऊस अपेक्षित होता. मोठा पाऊस नसल्याने प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.पावसाने लवकर हजेरी लावली नाही, तर पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 03 Aug 2026 10:05 AM (IST)

    जंतर मंतर वरील जेंझी आंदोलनानंतर राज्यात शिवसेना एक्शन मोडवर

    २०२९ रोजी देशात ३८ कोटी तरूण झेंजी मतदार होणार असल्याने शिवसेकडून आखला जाणार मास्टर प्लान. शिवसेना लवकरच यासाठी ऐक बैठक बोलावण्यात आल्याची माहीती. जेंझी तरूण मतदारांचे नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहर्याची निवड करणार शिवसेना यासाठी पक्षातील नेत्यांच्या तरुण मुलांना आणि विविध सामाजिक संघटनेत तरुणांचं नेतृत्व करणार्या युवा चेहर्यावर शिवसेना करणार काम… – सुत्र

  • 03 Aug 2026 09:48 AM (IST)

    वसईत पिता पुत्रावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

    अवघ्या 76 हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून पिता पुत्रावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसई पूर्वेतील नाईकपाडा येथील विमल कंपाउंड परिसरात 31 जुलै रोजी ही घटना घडली आहे. शिवाकांत तिवारी (28 ), रामकृपाल तिवारी( 57) असे जखमी झालेल्या पितापुत्राचे नाव आहे. सध्या पिता-पुत्रांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 03 Aug 2026 09:27 AM (IST)

    आज ठरणार प्रशांत किशोर विधानसभेत जाणार की नाही? मतमोजणीला सुरुवात

    तीन राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. बिहारच्या बांकीपूर, मध्य प्रदेशच्या दतिया आणि गुजरातच्या मांजलपूर या तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. गुजरातच्या मांजलपुरमधून भाजपचे सतीश गोविंदभाई पटेल आघाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार पिछाडीवर आहे. दातियामधून भाजपचे आशुतोष तिवारी आघाडीवर आहेत. बिहारच्या बांकीपूरमधून प्रशांत किशोर निवडणूक रिंगणात आहेत.

  • 03 Aug 2026 09:19 AM (IST)

    हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले

    2 लाख हजार 34 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आले. नदी काठावर न जाण्याचा आव्हान प्रशासनाने केलं आहे.

  • 03 Aug 2026 08:57 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यात अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांचा हल्ला; प्रेत ठेवून ग्रामस्थांना पळ काढावा लागला

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांच्या मोहोळाने हल्ला चढवल्याने एकच गोंधळ उडाला. या अनपेक्षित घटनेमुळे उपस्थित ग्रामस्थांना काही काळासाठी मृतदेह जागेवरच ठेवून जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच स्मशानभूमी परिसरातील मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि उपस्थितांवर तुटून पडले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे स्मशानभूमीत भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी सैरावैरा धाव घेतली.

  • 03 Aug 2026 08:50 AM (IST)

    कृष्णा नदीत रंगल्या होडयांच्या शर्यतीचा थरार

    सांगलीच्या कृष्णा नदीत आज पुन्हा एकदा परंपरा,साहस आणि थराराचा संगम पाहायला मिळाला.दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात पार पडलेल्या पारंपरिक होड्यांच्या शर्यतीने सांगलीकरांची मने जिंकली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हून अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेत प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाला छेद देत आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णाराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला.तर चुरशीच्या या लढतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावत मानाची गदा आपल्या नावावर केली.

  • 03 Aug 2026 08:40 AM (IST)

    खान्देशातील दमदार पावसामुळे तापी नदीने धारण केले रौद्ररूप

    खान्देशातील दमदार पावसामुळे तापी नदीने  रौद्ररूप धारण केले. नंदुरबारच्या सारंगखेडा बॅरेजचे १० तर प्रकाशा बॅरेजचे १३ दरवाजे उघडले आहेत. सारंगखेडा बॅरेजमधून १ लाख ३२ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  पुढील काही दिवसांत पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे.

  • 03 Aug 2026 08:35 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर, सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसला परवानगी नाही 

    छत्रपती संभाजीनगर मध्ये सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. NPA स्वीकारल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही; डॉक्टरांच्या याचिका फेटाळल्या आहेत.

  • 03 Aug 2026 08:30 AM (IST)

    आजपासून विदर्भातील 11 जिल्ह्यांत 5 वी मंडल जनगणना यात्रा

    जातीनिहाय जनगणना न झाल्याने ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाचे दरवर्षी 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्र सरकारने तातडीने जातीनिहाय जनगणना करावी, या प्रमुख मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने विदर्भात 5 वी मंडल जनगणना यात्रा आयोजित करण्यात आली आहे. भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा सर्व ११ जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, मुख्य संयोजक उमेश कोरम यांनी या जनजबाब यात्रेत सर्व नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या यात्रेची सुरुवात आज भंडारा येथून होणार असून ओबीसी नेते विजय वडेट्टीवार हे या यात्रेला हिरवी झेंडी देणार आहेत.

  • 03 Aug 2026 08:20 AM (IST)

    भोकरदन नगरपरिषद प्रशासनाची पाणीपट्टी आणि मालमत्ता करापोटी 76 लाख रुपयांची थकबाकी

    जालन्याच्या भोकरदन नगर परिषद प्रशासनाची भोकरदन शहरातील नागरिकांकडे पाणीपट्टी आणि मालमत्ता करापोटी जवळपास 76 लाख रुपयांची थकबाकी थकीत असल्याची माहिती समोर आली मात्र नगर परिषदेच्या सुरु असलेल्या कर वसुली मोहिमेकडे शहरातील नागरिकांनी कानाडोळा केला असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शहरातील मूलभूत सुविधा पुरविण्यात नगरपरिषद अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. मागील वर्षी नगरपरिषद प्रशासनाने मालमत्ता करापोटी 45 लाख तर पाणीपट्टी 15 लाख रुपये असे एकूण 60 लाख रुपये वसूल केले होते, मात्र यंदा केवळ 65 लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासन कडून करण्यात आली, दरम्यान शहरातील नागरिकांनी थकबाकी भरून तात्काळ सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलं.

  • 03 Aug 2026 08:15 AM (IST)

    कल्याणमध्ये जीवघेणी स्टंटबाजी! धावत्या कारच्या बोनटवर बसून तरुणाचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल

    कल्याणमध्ये वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. संतोषी माता रोडवरून सुरू झालेला हा थरारक प्रवास स्वामी सहजानंद चौक मार्गे आग्रा रोडपर्यंत सुरू असल्याचे समोर आले. भर रस्त्यात बोनटवर बसून तरुणाने धिंगाणा घातल्याने इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशा जीवघेण्या स्टंटमुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती; संबंधित तरुण आणि वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी.

  • 03 Aug 2026 08:10 AM (IST)

    जालन्यातील अंबड आगाराच्यात ‘राजमाता जिजाऊ’च्या 6 नव्या एसटी बसेस दाखल

    जालना जिल्ह्यातील अंबड एसटी आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या 6 नव्या एसटी बसेस दाखल झाल्या. या बसेसचे उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ‘राजमाता जिजाऊ’ बसेसच्या समावेशामुळे अंबड आगाराची प्रवासी सेवा अधिक सक्षम होणार असून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे.तसेच अंबड आगारासाठी आणखी चार नवीन बसेस लवकरच दाखल होण्याची शक्यता असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

  • 03 Aug 2026 08:04 AM (IST)

    डोंबिवलीत मास्कधारी चोरट्यांची दहशत! CCTV पाहताच कॅमेरा फिरवला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात काळे कपडे, डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातलेल्या चोरट्यांनी घरफोडी करत दहशत निर्माण केली. शंकरा नगर येथील समर्थ कृपा इमारतीत तीन ते चार जणांच्या चोराच्या टोळीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांची संपूर्ण हालचाल इमारतीतील इमारतीतील CCTV कॅमेरा पाहताच चोरट्यांनी तो दुसऱ्या दिशेला फिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधी त्यांचे चेहरे आणि हालचाली कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या. सलग घरफोडीच्या घटनांमुळे सोनारपाडा परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Published On - Aug 03,2026 8:03 AM

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी