AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train Fire : भल्या पहाटे ट्रेनला भीषण आग, प्रवाशांमध्ये खळबळ; जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडकीतून मारल्या उड्या

बिहारमध्ये भल्या पहाटे पॅसेंजरला ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

Train Fire : भल्या पहाटे ट्रेनला भीषण आग, प्रवाशांमध्ये खळबळ; जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडकीतून मारल्या उड्या
| Updated on: Aug 03, 2026 | 8:01 AM
Share

बिहारच्या सहरसा जिल्ह्य्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला सोमवारी सकाळी 3. 25 वाजता आग लागली. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेनमधील काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या.

प्राथमिक माहितीनुसार, पॅजेंजरला आग ही सुरुवातीला इंजिनला लागली. त्यानंतर ट्रेनच्या तीन डब्यापर्यंत आग पसरली. ट्रेनला आग लागल्यानंतर हवेत धुराचे लोट पसरू लागले. आगीने भयानक रूप घेतल्यानंतर स्टेशनवर प्रवाशांची एकच धावाधाव झाली.

प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, ट्रेनला आग लागली. त्यानतंर काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केलं. या ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी तातडीने ट्रेनमधून उतरण्यास सुरुवात केली. सर्व प्रवासी वेळेत ट्रेनमधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणत्याही प्रकराची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती हाती आली आहे.

‘सर्वात आधी डब्याच्या खाली उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर डब्याच्या खाली जाऊन बघितले. त्यानंतर तातडीने इतर प्रवाशांना अलर्ट केलं. त्यामुळे अनेकांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं, अशी माहिती प्रवासी मोहम्मद युसुफ यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ट्रेनची आग विझविण्यास सुरुवात केली. जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळालं. परंतु या घटनेने ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

रेल्वे (Railway) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ट्रेनला आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ट्रेनला लागलेली आग पूर्णपणे विझविल्यानंतर याचा तपास केला जाईल. या दुर्घटनेत ट्रेनच्या डब्यांना आग लागली. या घटनेत जीवितहानी झालेली नसली, तरी वित्तहानी झाल्याचे समोर आलं आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होऊ लागले आहेत. या ट्रेनमधील प्रवाशांना रेल्वेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी