AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बारामती पोट निवडणुकीची घोषणा, मतदान कधी? निकाल किती तारखेला? वाचा…

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

मोठी बातमी! बारामती पोट निवडणुकीची घोषणा, मतदान कधी? निकाल किती तारखेला? वाचा...
Baramati by ElectionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 15, 2026 | 4:54 PM
Share

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील 5 महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांची तर पुद्दुचेरी या केंद्रसाशित प्रदेशात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच इतरही काही राज्यांमधील पोट निवडणुकांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही काळापूर्वी निधन झाले आहे, त्यामुळे राहुरी विधानसभेचीही जागा रिक्त झाली होती. आता निवडणूक आयोगाने या जागांवर पोट निवडणुकीची घोषणा केली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

कोणत्या राज्यात कधी मतदान, कधी निकाल?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ या दोन राज्यांत तसेच पुद्दुचेरी या केंद्रशाशित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तामिळनाडू येथे 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर पश्चिम बंगाल या एमेकव राज्यात दोन 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार. या सर्व चार राज्ये तसेच एका केंद्रशाशित प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहे.

राज्यातील दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार?

बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता या दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्याचीही शक्यता आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार या निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे विरोधी पक्षातून या जागेवर उमेदवार कदाचित दिला जाणार नाही. तसेच राहुरीतही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...