AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

400 कोटी बजेटचा सुपरस्टारचा चित्रपट फ्लॉप; ओटीटीवर येताच केली कमाल

तब्बल 400 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. परंतु ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला अपेक्षित यश मिळताना दिसतंय. हा रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपट जियो हॉटस्टारवर ट्रेंड होतोय.

400 कोटी बजेटचा सुपरस्टारचा चित्रपट फ्लॉप; ओटीटीवर येताच केली कमाल
ओटीटीवर ट्रेंड होतोय चित्रपटImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 15, 2026 | 4:24 PM
Share

एखाद्या चित्रपटाचा बजेट तगडा असला आणि त्यात एकापेक्षा एक दमदार कलाकार असले तरी बॉक्स ऑफिसवर त्या चित्रपटाला यश मिळेलच असं नाही. असे अनेक बिग बजेट चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप होतात. मग त्यात सुपरस्टार असला तरी कथेत दम नाही म्हणून प्रेक्षकांनी अशा चित्रपटांना नाकारलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. असाच एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता आणि त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला होता. कारण त्यांनी या चित्रपटाच्या व्हीएफएक्स आणि सेट डिझाइनवर पाण्यासारखा पैसा वाहिला होता. परंतु आता ओटीटीने या चित्रपटाला थोड्याफार प्रमाणात दिलासा दिला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘द राजा साब’. बाहुबली स्टार प्रभासची यात मुख्य भूमिका होती.

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या या चित्रपटाला मोठ्या आशेने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. परंतु या हॉरर कॉमेडीला जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आलं, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला अपेक्षित असा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. या चित्रपटात प्रभाससोबतच संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्याही भूमिका आहेत. ‘द राजा साब’ हा एक रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याची कथा राजू (प्रभास) नावाच्या एका तरुण आणि त्याच्या आजीभोवती फिरते. आजीला अल्झायमर असून ती त्यांच्या बेपत्ता पतीला (संजय दत्त) शोधून काढण्याचा हट्ट धरते. आजोबांचा शोध घेता घेता राजू एका रहस्यमयी बंगल्यापर्यंत पोहोचतो. इथूनच कथेत वळण येतं आणि त्यानंतर एकामागोमाग एक जबरदस्त ट्विस्ट पहायला मिळतात.

‘बाहुबली’नंतर प्रभासचा मोठा चाहतावर्ग देशभरात निर्माण झाला. फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदीतही त्याची लोकप्रियता वाढली होती. त्यामुळे प्रभासचा चित्रपट आणि बिग बजेट या गोष्टी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून येईल, असं निर्मात्यांना वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच होतं.

या पॅन इंडिया चित्रपटाचं दिग्दर्शन मारूतीने केलं असून थिएटरनंतर त्याला ओटीटीवर स्ट्रीम करण्यात येत आहे. ओटीटीवर येताच हा चित्रपट रातोरात टॉप ट्रेंडिंगच्या यादीत पोहोचला. हा चित्रपट तुम्ही जियो हॉटस्टारवर पाहू शकता. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड होतोय.

Follow Us
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या नेत्याचा पराभव करत दणदणीत विजय
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...
नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
Nagpur Vidhan Parishad Result | नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...