AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित

tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित

| Updated on: Jun 22, 2026 | 10:05 AM
Share

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची अधिकृत घोषणा त्यांनी धाराशिवमधील कार्यकर्त्यांसमोर केली असल्याचे सांगितले जात आहे. “मी शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. तसेच, “पैसा आणि हव्यासापोटी मी हा निर्णय घेतलेला नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी आपले वैयक्तिक आणि राजकीय संबंध चांगले असल्याचे सांगितले. “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मला चांगला स्नेह लाभला आहे,” असे ओमराजे म्हणाले.

या निर्णयामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमराजे यांच्या या निर्णयानंतर धाराशिव आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Published on: Jun 22, 2026 10:05 AM

Follow Us