AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Gite : गोकुळ गीतेंचा प्रचंड विजय, निवडून येताच मागितली जाहीर माफी… असं काय घडलं? म्हणाले, मी प्रचार…

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला असून महायुतीचे नरेंद्र दराडे पराभूत झाले आहेत. विजयानंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया दिली, "लोकांनी 'फिट उमेदवार' निवडला." कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांचे न ऐकता विजय मिळवून दिल्याचे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले.

Gokul Gite : गोकुळ गीतेंचा प्रचंड विजय, निवडून येताच मागितली जाहीर माफी... असं काय घडलं? म्हणाले, मी प्रचार...
गोकुळ गीते यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jun 22, 2026 | 11:46 AM
Share

विधान परिषद निवडणुकांचा निकाल समोर आला असून नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले असून महायुतीचे नरेंद्र दराडे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे महायुतीत खळबळ माजली आहे. या निकालानंतर गोकुळ गीते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विजयानंतर त्यांनी चक्क माफी मागितली आहे.

6 वर्षांचं या मतदारसंघाच्या आमदराकीचं टेन्युअर आहे. आणि अशा कालावधीमध्ये एक फिट उमेदवार जर लोकांना पाहिजे असेल तर तो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि अनफिट उमेदवार त्यांनी नाकारला, असं गीते म्हणाले. मी माझा प्रचार थांबवला होता. एकनाथ शिंदे आमि गिरीष महाजन यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलो होतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो वियज मला मिळवून दिला त्यबद्दल मी शतश: आभारी आहे, असं गोकुळ गीते विजयानंतर म्हणाले.

दराडेंबद्दल प्रश्न  येताच एका वाक्यात संपवला विषय

या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीच्या नरेंद्र दराडे यांनी जाहीर संताप व्यक्त केला होता. माझा विश्वासघात झाला आहे, सगळे नेते खोटारडे आहेत, सगळे सारखेच आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र त्यांच्या या बोलण्यावर गोकुळ गीते यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. त्याचं उत्तर तेच देतील, अस म्हणत एका वाक्यात त्यांनी विषय संपवला.

शिंदेना भेटायला जाणार का ?

दरम्यान नाशिकचा धक्कादायक निकाल आल्यानंतर शिंदे गटाकडून गोकुळ गीते यांच्या विश्वासू सहकाऱ्याला पहिला फोन करून गीतेंना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याच्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.  गोकुळ गीते यांचे विश्वासू नाना गामने यांना मंत्री उदय सामंत यांनी फोन केल्याची माहिती समोर आली होती.  यानंतर गोकुळ गीते यांना याबद्दल, पुढल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, याबद्दल मला अजून काहीच माहिती नाही, तुम्हाला माहीत असेल तर मला माहीत नाही, असं गीते म्हणाले.

कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. हा विजय जरी गोकुळ गीतेंचा असला तरी या व्यक्तीमागे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांना विश्वासत घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे, असं म्हणत गीते यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही यावर स्पष्ट बोलण्यास नकार दिला.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती