
मुंबई : नुकताचं व्हॅलेन्टाईन डे संपला आहे. “व्हॅलेन्टाईन डे” (valetine day) च्या काळात तयार करण्यात आलेले व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) आज सुध्दा व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रेम काही एका दिवसासाठी मर्यादीत नाही, त्याचबरोबर ते कधीही व्यक्त केलं जाऊ शकतं. शेतामध्ये एक वयोवृद्ध महिला आपल्या नवऱ्याकडं प्रेम व्यक्त करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे (viral video) शेतात काम करणारी जोडी चांगलीचं चर्चेत आली आहे. आतापर्यंत तो व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ आवडल्याचं सुध्दा सांगितलं जात आहे.
हा व्हायरल व्हिडीओ शेतातला आहे. वयोवृद्ध महिला हातात एक छोटसं फुल घेऊन आपल्या पतीला “I Love You” म्हणत आहे. हे सगळं शेजारी उभ्या असणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे. ज्यावेळी फुल देण्यासाठी काकू जात आहेत. त्यावेळी दोघंही रोमांटिक मूडमध्ये दिसत आहेत. त्यावेळी काका एकदम लहान मुलासारखी रिअॅक्शन देतात. त्याचबरोबर काकूसोबत मस्करी करीत आहेत. शेजारी एक महिला तिच्या कंबरेवरती मुलं घेऊन उभी आहे, ती सुद्धा हसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर beautiful_world_pixs या नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारीला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या अपलोड व्हिडीओवरती अनेकांनी कमेंट केली आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांना तो व्हिडीओ अधिक आवडला सुध्दा आहे. एका युझरने कमेंटमध्ये इतकं प्रेम असं म्हटलं आहे. दुसऱ्या एकाने लोकांचं मन जिंकलं या जोडप्याने असं म्हटलं आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने “खरं तर ही खूप रोमांटीक जोडी आहे”