स्वस्तात मस्त जुगाड! हे बघून तर तुम्हालाही धक्का बसेल…

लोकं विचार करतात पैसे खर्च करण्यापेक्षा मी जुगाड करेल. मग असे बऱ्याच गोष्टींचे जुगाड असतात. विशेषतः कन्स्ट्रक्शन साईटवर आपल्याला असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात. लोकं तर गाड्यांचे सुद्धा जुगाड करतात. दोन चाकी पासून एखादी चारचाकी गाडी बनवतात.

स्वस्तात मस्त जुगाड! हे बघून तर तुम्हालाही धक्का बसेल...
Jugaad On Construction Site
| Updated on: Jul 07, 2023 | 3:26 PM

मुंबई: भारतात जुगाड म्हणजे एकदम सहज होणारी गोष्ट आहे. लोकं विचार करतात पैसे खर्च करण्यापेक्षा मी जुगाड करेल. मग असे बऱ्याच गोष्टींचे जुगाड असतात. विशेषतः कन्स्ट्रक्शन साईटवर आपल्याला असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात. लोकं तर गाड्यांचे सुद्धा जुगाड करतात. दोन चाकी पासून एखादी चारचाकी गाडी बनवतात. जुगाड मध्ये पैसा कमी आणि डोकं जास्त लागतं. मोठमोठे लोकं हे जुगाड ट्विटरवर पोस्ट करून यांचं कौतुक करत असतात. फक्त आपल्या भारतीयांनाच नव्हे तर विदेशातल्या लोकांना सुद्धा जुगाडाच फार कौतुक वाटतं.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघा. यात वीटा ठेवण्यासाठी एक जुगाड करण्यात आलाय. हा जुगाड तुम्ही बघाल तर तुम्हाला सुद्धा खूप हसू येईल. फळी लावून यांनी अशी आयडिया केलीये की पटापट एकामागून एक विटा ठेवल्या जातायत. एखाद्या खेळण्याप्रमाणे हा जुगाड वाटतो. तो मजूर सुद्धा एकामागे एक वीट लावत जातो. व्हिडीओ बघणारा बघतच राहतो. परदेशात मोठमोठे मशिन्स ज्या कामासाठी लागतात त्या कामासाठी जर आपल्याकडे असा जुगाड केला जात असेल तर का कौतुक वाटू नये?

6 जुलै रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या क्लिपला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर युजर्स त्यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, मजुरांची ही कल्पना बहुतांश लोकांनी फ्लॉप असल्याचे वर्णन केले आहे, कारण 4 मजुरांना करावे लागते. एकाने गमतीने टिप्पणी केली – ज्याने त्यांना कामावर घेतले आहे त्याला दोनची किंमत विनाकारण मोजावी लागेल.