Video : ढिंचॅक पूजाचं नवं गाणं रिलीज, “एक और सेल्फी लेने दो…” ची सोशल मीडियावर चर्चा…

| Updated on: May 14, 2022 | 1:05 PM

पूजाचं नुकतंच एक गाणं रिलीज झालं आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हे गाणं आहे, "एक और सेल्फी लेने दो..." हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : ढिंचॅक पूजाचं नवं गाणं रिलीज, एक और सेल्फी लेने दो... ची सोशल मीडियावर चर्चा...
ढिंचॅक पूजाचं नवं गाणं
Follow us on

मुंबई : सतत सोशल मीडियावर चर्चेत असणारी ढिंचॅक पूजा (Dhinchak Pooja) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्याचं कारण आहे तिचं नवं गाणं… पूजाचं नुकतंच एक गाणं रिलीज झालं आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हे गाणं आहे, “एक और सेल्फी लेने दो…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हीडीओमध्ये पूजाने पांढऱ्या रंगाचा गेटअप केलाय. व्हीडीओमध्ये ती कधी आयफेल टॉवरसमोर तर कधी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसमोर फोटो काढताना दिसत आहे. तिचं हे गाणं सध्या सोशल मीडीयावर चर्चेत (viral video) आहे.

ढिंचॅक पूजाचं नवं गाणं

पूजाचं नुकतंच एक गाणं रिलीज झालं आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हे गाणं आहे, “एक और सेल्फी लेने दो…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हीडीओमध्ये पूजाने पांढऱ्या रंगाचा गेटअप केलाय. व्हीडीओमध्ये ती कधी आयफेल टॉवरसमोर तर कधी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसमोर फोटो काढताना दिसत आहे. तिचं हे गाणं सध्या सोशल मीडीयावर चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

गाण्याचे बोल

ढिचॅक पूजा तिच्या नावाप्रमाणेच काही अतरंगी गाणी तयार करत असते. तिच्या गाण्याचे शब्दही तितकेच वेगळे असतात. “रात के बज गए एक या दो, एक और सेल्फी लेने दो. बाकी सब को सोने दो, मुझे सेल्फी लेने दो. आयफिल टावर के सामने, ताजमहल के पास. बुर्ज खलीफा के नीचे, स्टैच्यू ऑफ लिबर्टी के साथ”, असे या गाण्याचे बोल आहेत.

पूजाच्या ‘एक और सेल्फी लेने दो’ या नव्या गाण्याला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. ढिंचक पूजाच्या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळतो. पण तिचं हे गाणं या आधीच्या गाण्यांसारखं व्हायरल झालं नसलं तरी सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी तिने ‘सेल्फी मैं ले ली’, ‘स्वॅग वाली टोपी’ आणि ‘दिल का शूटर’ ही गाणी गायली आहेत. तीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.